प्रेमप्रकरणातून अपहरण झालेल्याची सुटका
Satara News Team
- Sun 15th Jun 2025 09:55 am
- बातमी शेयर करा
वाई : पसरणी (ता. वाई) येथील तरुणाला कोल्हापूरमधील काही युवकांनी मंगळवारी रात्री बेदम मारहाण करून अपहरण केले होते. वाई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने कोल्हापूर पोलिसांची मदत घेत अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करून पाच संशयितांना अटक केली.
संशयितांना वाई न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. सनी रमेश भोसले (रा. उत्तेश्वर मंदिर कोल्हापूर मूळचा राहणार पसरणी ता. वाई) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गणेश विश्वास काटकर, प्रशांत प्रकाश सुर्वे, शुभम सुनील जाधव, मानसिंग विजयसिंह भोसले, अभिजित उर्फ पंप्या सर्जेराव तवंदकर (सर्व रा. उत्तेश्वर मंदिर महादेव कोल्हापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सनी भोसले हा लहानपणापासूनच कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी भागातील उत्तरेश्वर मंदिरा शेजारी राहत आहे. त्याचे शेजारी राहणार्या विवाहित महिलेसोबत प्रेम प्रकरण चालू होते, त्यातूनच त्याने त्या महिलेला फूस लावून पसरणी येथे पळवून आणले होते. तिच्या पतीसह सात लोकांनी पसरणीत येवून त्याला बेदम मारहाण करत बरोबर आणलेल्या चार चाकी गाडीतून त्याचे अपहरण करून कोल्हापूरला नेले. अपहरण झाल्याचे वाई पोलीस ठाण्याचे पोनि जितेंद्र शहाणे यांना समजताच त्यांनी त्वरित वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाला शोधार्थ पाठवले. या पथकाने कोल्हापूर पोलिसांची मदत घेत अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करुन संशयितांना अटक केली.
संशयितांना वाई न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच वाईतील खाजगी रुग्णालयात रमेश भोसले याच्यावर उपचार चालू आहेत. अधिक तपास वाई पोलिस करत आहेत.
स्थानिक बातम्या
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sun 15th Jun 2025 09:55 am
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sun 15th Jun 2025 09:55 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sun 15th Jun 2025 09:55 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sun 15th Jun 2025 09:55 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 15th Jun 2025 09:55 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 15th Jun 2025 09:55 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sun 15th Jun 2025 09:55 am
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sun 15th Jun 2025 09:55 am
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 15th Jun 2025 09:55 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sun 15th Jun 2025 09:55 am
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sun 15th Jun 2025 09:55 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sun 15th Jun 2025 09:55 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sun 15th Jun 2025 09:55 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sun 15th Jun 2025 09:55 am











