एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कराडमधील दोन डॉक्टरांसह चौघांचे बनावट अश्लील व्हिडीओ धक्कादायक प्रकार
Satara News Team
- Wed 11th Jun 2025 09:38 am
- बातमी शेयर करा
कराड : कराड मध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली असून कराड शहरातील महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि एका युवक - युवतीची एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बाबद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी 20 मे रोजी एका युवतीला एका अनोळखी व्यक्तीने व्हॉटस् अॅपवरील एका ग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. त्या ग्रुपमध्ये 26 अन्य लोकांना समाविष्ट करण्यात आले होते. त्याच मध्यरात्री संबंधित व्हॉटस्अॅप ग्रुपवर एक महिला डॉक्टर आणि या महिला डॉक्टरशी ओळखसुद्धा नसणार्या अन्य एका डॉक्टरचे फोटो वापरून तयार केलेला अश्लील व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. त्याच कालावधीत या ग्रुपवर दुसरा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये संबंधित तक्रारदार युवतीचा एका युवकासोबत अश्लील व्हिडीओ बनविण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे व्हिडीओ बनविताना मजकूर, व्हिडीओला अश्लील भाषेतील आवाज सुद्धा जोडण्यात आला होता.
या प्रकारानंतर संबंधित युवतीने माहिती घेत ज्या - ज्या लोकांचे अश्लील व्हिडीओ बनविले आहेत, त्या सर्वाना शोधून काढत कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. परराज्यातून व्हिडीओ बनवून घेण्यासाठी त्याने पैसे दिल्याचे परराज्यातील संशयिताकडून पोलिसांना समजले आहे. त्याचबरोबर संबंधिताचे काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असून, संशयित डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
स्थानिक बातम्या
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Wed 11th Jun 2025 09:38 am
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Wed 11th Jun 2025 09:38 am
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Wed 11th Jun 2025 09:38 am
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Wed 11th Jun 2025 09:38 am
प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : मिनाक्षी मोरे
- Wed 11th Jun 2025 09:38 am
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Wed 11th Jun 2025 09:38 am
संबंधित बातम्या
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Wed 11th Jun 2025 09:38 am
-
औंधमध्ये गुपचूप वाढणारे अवैध धंदे — प्रशासन आणि प्रस्थापितांचा मौन का?
- Wed 11th Jun 2025 09:38 am
-
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Wed 11th Jun 2025 09:38 am
-
राजाचे कुर्ल्यातील युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.
- Wed 11th Jun 2025 09:38 am
-
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Wed 11th Jun 2025 09:38 am
-
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Wed 11th Jun 2025 09:38 am
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Wed 11th Jun 2025 09:38 am
-
ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'
- Wed 11th Jun 2025 09:38 am












