माणमध्ये परमिट रूम मध्येही देशी दारूचा ‘सुळसुळाट’

दहिवडी  : साताऱ्याच्या माण तालुक्यातील दहिवडी शहरासह संपूर्ण माण तालुक्यात परमिट रूममध्ये परवानगी नसतानाही देशी दारू विक्री सुरू असल्याचे समोर येत आहे. माण तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडी शहरात परमिट रूम मध्येही विनापरवानगी खुलेआम देशी दारू विक्री मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे वृत्त खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.परंतू उत्पादन शुल्क विभाग गांधारीच्या भूमिकेत असून उत्पादन शुल्क विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष नक्की कोणत्या कारणासाठी?असा सवाल माण तालुक्यातील सामान्य नागरिक विचारत आहेत.


 माण तालुक्यातील अवैध धंद्यांवर म्हसवड पोलिसांनी गेल्या काही दिवसापूर्वी कारवाईचा बडगा उगारला आहे.यामध्ये सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.पळशी येथील ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता मात्र अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी छापा टाकून १ लाख ६८ हजारांच्या दरम्यानच्या मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केली आहे. 


 उत्पादन शुल्क विभागाचे मध्यार्क युक्त पदार्थावर नियंत्रण ठेवण्याचे काम असते. उत्पादन शुल्क जमा करणे,परवाने देणे आणि बेकायदेशीर कामांवर कारवाई करणे यासारखी कामे उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने केली जातात.याबाबत उत्पादन शुल्क कायद्याची अंमलबजावणी याच विभागाच्या वतीने केली जाते. उत्पादन शुल्क कायद्याचीअंमलबजावणी करणे.या विभागाच्या वतीने मद्य आणि इतर मद्यार्कयुक्त पदार्थांच्या सेवनाने दुष्परिणाम आणि कायद्याचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण केली जाते. परंतू माण तालुक्यात या विभागाचे जाणून बुजून दुर्लक्ष आहे.गेल्या काही वर्षांपूर्वी म्हसवड यात्रेच्या दरम्यान उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच हाकेच्या अंतरावर खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असतानाही उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बघ्याच्या भूमिकेत दिसून आले.त्यानंतर म्हसवड पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई केली परंतु दहिवडीसह माण तालुक्यातील परमिट रूम व परमिट रूम धारकांवर नक्की अभय कोणाचे?अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. 

साताऱ्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक माण तालुक्यावर मेहरबान होणार की बघायच्या भूमिकेत राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच अशा परमिट रूम धारकांना पाठीशी घालणारा ‘उत्पादन शुल्क’चा आका कोण? हा संशोधनाचा विषय आहे. उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दहिवडी नगरपंचायत हद्दीत जवळपास सर्वच परमिट रुममध्ये बेसुमार देशी दारू विक्री केली जात असून अवैध धंद्यांना ऊत आला आहे.तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी देशी दारुची विक्री सुरू असल्याची कल्पना उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना असतानाही डोळेझाक कशासाठी? असा प्रश्न दहिवडीकरांना सतावत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला