शिवथर येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन ...दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध.
सुनिल साबळे- Wed 19th Jun 2024 02:54 pm
- बातमी शेयर करा
शिवथर.: महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हाताला हातभार लागावा यासाठी जास्त प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो परंतु शासन प्रति लिटर 28 ते 30 दर देऊन सर्वसामान्य शेतकऱ्याची दिशाभूलच शासन करत आहे आम्हाला 40 ते 45 रुपये दर प्रति लिटर दुधाला मिळावा यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांना आणि दुग्ध व्यवसायिकांना घेऊन दूध ओतून आंदोलन करत आहोत असे प्रतिपादन शेतकरी संघटना किसान मंच चे जिल्हा युवा अध्यक्ष संदीप साबळे यांनी केले
शेतकऱ्यांचे अर्थ वाहिनी म्हणजे शेती आणि शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो दर पंचवार्षिकला शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य शासन आश्वासनाची खैरातच करत असते परंतु या राजकीय नेत्यांना कोणाचेच काही देणे घेणे नाही फक्त मताचा जोगवा मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या पुढे निवडणुकी आदोगर हात जोडून आणि आश्वासन देऊन जातात निवडून आल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे काहीही देणं घेणं नाही अशीच अवस्था महाराष्ट्र मध्ये दिसून येत आहे राज्य शासनाने सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी दूधाला 40 ते 45 रुपये दर द्यावा आणि जनावरांच्या खाद्यासाठी जे खाद्य वापरले जात त्याचा दर कमी करावा म्हणजेच हे सर्वसामान्य शेतकऱ्यांची अर्थवाहीनी समजल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसायाला न्याय मिळेल असेही जिल्हा युवा अध्यक्ष संदीप साबळे बोलत होते आंदोलन करतेवेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी व दुग्ध व्यवसायिक उपस्थित होते
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 19th Jun 2024 02:54 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 19th Jun 2024 02:54 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 19th Jun 2024 02:54 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 19th Jun 2024 02:54 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 19th Jun 2024 02:54 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 19th Jun 2024 02:54 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 19th Jun 2024 02:54 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Wed 19th Jun 2024 02:54 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 19th Jun 2024 02:54 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Wed 19th Jun 2024 02:54 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Wed 19th Jun 2024 02:54 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Wed 19th Jun 2024 02:54 pm










