पोविनाक्यावरील ग्रेट सेपरेटरच्या काम निकृष्ठ दर्जाचे रमेश उबाळे

कामाची चौकशी करा, ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाका, बांधकाम अधीक्षकांना निवेदन

 पुसेगाव : पोवईनाक्यावर  हजारो कोटी रुपये खर्च करून झालेले ग्रेट सेपरेटरचे मोठे काम झाले सताऱ्यातील वाहतुकीला शिस्तही लागली परंतु ग्रेट सेपरेटरचे झालेले हे काम   निकृष्ट दर्जाचे झाले असून  या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता  जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी  व्यक्त करत या कामाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे अधीक्षक बांधकाम विभाग, पुणे यांच्याकडे केली असून  निवेदनात काही मुद्दे मांडले असून या अनुषंगाने पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधित ठेकेदाराचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
      याप्रकरणी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पोवई नाका येथील काम प्लॅन व प्रोफाइलनुसार झाले नाही. पोविनाका ते कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नियमानुसार सर्व्हे रोड खोदून नवीन बनविणे गरजेचे असताना  संबंधीत ठेकेदाराने आहे त्याच रस्त्यावर डांबर टाकले आहे. नकाशानुसार लेव्हल करण्यात आली नाही. नकाशाप्रमाणे सर्व्हेरोड साईडला गटर व फुटपाथ दाखविण्यात आलेले आहेत.परंतु ठेकेदाराने कोणत्याही रस्त्याला गटर व फुटपाथ केलेले नाही. त्यामुळे या कामांचे बील ठेकेदाराच्या बिलातुन कमी करण्यात यावे.जुन्या नकाशाप्रमाणे रस्त्याच्या भरावमध्ये जीएसबी, डब्ल्यू एम एम हे लेयर होते. ठेकेदाराने जुने नकाशे बदलून नवीन नकाशे बनवून  लेयर गायब केले आहेत.सदर नकाशामध्ये बरेच बदल केले असल्याने जुन्या इस्टिमेटचा व नव्या इस्टिमेटचा सविस्तर तुलनात्मक तक्ता द्यावा.पुलाच्या कामामध्ये रिटनिंगवालची उंची नकशाप्रमाणे करण्यात आलेली नाही.उंची कमी केली आहे.पोवई नाका ते स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्याला तहसीलदार कार्यालयासमोर मुख्य रस्त्याची रुंदी १७.१०० मीटर असताना तेथे १६.८०० मीटर मिळत आहे.म्हणजे रस्त्याची रुंदी कमी करण्यात आली आहे हे स्पष्ट होते.मेन रस्ता व सर्व्हिसरोड रस्ता जीएसबी, डब्ल्यू एमएम,डीबीएम, बीसी या लेअरची जाडी कमी झाली आहे. पुलाच्या कामामध्ये कमी स्टील वापरण्यात आले आहे.पुलाचे कामामध्ये व रस्त्याच्या कामामध्ये वापरण्यात आलेले काँक्रिट निकृष्ट दर्जाचे आहे. 
       या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, जिल्हाधिकारी यांनाही माहितीसाठी देण्यात आल्याचे रमेश उबाळे यांनी म्हटले आहे.
     रमेश उबाळे हे स्वतः बांधकाम व्यवसायिक असून या कामातील खाचाखोचा त्यांना माहीत आहेत. त्यांनी याबाबत अभ्यास करून या कामामध्ये अधिकरि व ठेकेदाराने संगनमत करून हे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे असा थेट आरोप केल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.


गांधी मार्गाने आंदोलन करणार 

हजारो कोटी रुपये खर्च करून सर्वसमामान्य जनतेच्या पैशातून ग्रेट सेपरेटरचे काम पूर्ण झाले आहे.परंतु शासकीय अधिकारी व ठेकेदार परस्परांशी संगनमत करून हे काम निकृष्ट दर्जचे करून  जनतेची फसवणूक केली आहे. या कामाची चौकशी झाली करून संबंधीत अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. अशी आमची मागणी आहे. असे न झाल्यास गांधी मार्गाने आपण आंदोलन करणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कायदा शिकवला आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करून यश कसे मिळवावे हे महात्मा गांधींची शिकवण आहे हे दोन महापुरुष आपले आदर्श असल्याचेही रमेश उबाळे यांनी बोलताना स्पष्ट केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला