झाडानी प्रकरणात संबंधितांना २९ जुलैला शेवटची संधी

कागदपत्रे, म्हणणे मांडण्यासाठी मुदत

सातारा : सहयाद्री वाचवा मोहीमेतंर्गत सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उघडकीस आणलेले झाडानी प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात याविषयी खडाजंगी चर्चा  झाल्यानंतर गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी नोटीस बजावलेले संबंधित हजर होते. यावेळी संबंधितांनी म्हणणे मांडले आणि काही कागदपत्रे दिली आणि उर्वरित कागदपत्र सादर करण्यासाठी आणखी मुदत देण्याची मागणी केली. त्यावर अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी दि.२९ जुलै ही तारीख देत ही म्हणणे मांडण्यासाठी आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी शेवटची संधी असल्याचे सांगितले. 

झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल 640 एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले होते.  याप्रकरणी पहिल्यांदा तिघांना आणि नंतर आठ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आज झालेल्या सुनावणी वेळी  जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, संगीता वळवी , अरमान वळवी, यांच्यासह संबंधित उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपले म्हणणे मांडले आणि काही कागदपत्रे सादर केली परंतु अजून काही कागदपत्र सादर करण्यासाठी मुदत मागितली असता अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी २९ जुलै ही तारीख देत ही शेवटची संधी असून त्यावेळेस संबंधित सर्व कागदपत्रे आणि म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला