खुशखबर! शिक्षक पदभरतीला सुरूवात; स्व - प्रमाणपत्र तयार करण्याच्या उमेदवारांना सुचना
- Satara News Team
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
- बातमी शेयर करा
सातारा : राज्यात सहा महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक पदभरतीला अखेर सुरूवात झाली आहे. पवित्र पाेर्टल मार्फत शिक्षक अभियाेग्यता आणि बुध्दिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे स्व- प्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवार दि. १ पासून सुरूवात झाली आहे. येत्या १५ सप्टेंबर पर्यंत स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
शिक्षक अभियाेग्यता आणि बुध्दिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा दि. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली. परीक्षेसाठी २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी परीक्षा दिली हाेती. या उमेदवारांना पवित्र पाेर्टल मार्फत स्व प्रमाणपत्र सुविधेला सुरूवात झाली आहे. त्याबाबत उमेदवारांना आवश्यक सुचना https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावरील पाेर्टलवर देण्यात आल्या आहेत.
स्व प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या रीक्त जागांची जाहिरात पाेर्टलवर प्रदर्शित केली जाईल. गुणवत्तेनुसार उमेदवारांचे पसंतीक्रम घेण्यात येतील आणि त्यानंतर निवड यादी तयार करून उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. मात्र, एकुण किती जागांवर पदभरती हाेईल त्याबाबत शिक्षण विभागाकडून अद्याप स्पष्टता दिलेली नाही.
टीईटीत गैरप्रकार केलेल्यांना संधी नाही
२०१८ आणि २०१९ मध्ये शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये गैरप्रकार केल्यामुळे परीक्षा परिषदेने प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना औरंगाबाद खंडपीठाने टेट २०२२ परीक्षा देता येत नसल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी हाेता येणार नाही. तसेच टेट- २०२२ परीक्षा एक वेळ देण्याची तरतूद आहे. मात्र, काही उमेदवारांनी एका पेक्षा जास्त वेळा टेट परीक्षा दिली आहे या उमेदवारांनाही सहभागी हाेता येणार नाही. तसेच दिसून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल असे शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट केले आहे.
शिक्षक भरती प्रक्रियाही नियमानुसार हाेणार
शिक्षक होण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. विविध संघटना आणि गटांनी विविध मागण्या मांडल्या होत्या आणि त्यातील काही विरोधाभासी होत्या. आम्ही विवादांचे समाधानकारक निराकरण केले आहे आणि तार्किकदृष्ट्या सुसंगत धोरण तयार केले आहे. टेट परीक्षा काेणत्याही त्रुटीशिवाय पार पडली. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियाही नियमानुसार हाेणार आहे. - सूरज मांढरे , शिक्षण आयुक्त
मुलांसाठी समर्पित भावनेने काम करा
शिक्षक हा पवित्र पेशा आहे. मुलांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा अभ्यास घ्यावा, ज्या शाळेवर नियुक्ती हाेईल त्या शाळेवर आणि गावावर प्रेम असले पाहिजे. गावातील मुले आणि भावीपिढीची जबाबदारी तुम्हा सर्वांवर असणार आहे. जी शाळेची निवड कराल त्यामध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी समर्पित भावाने काम करावे लागणार आहे. - दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
#teachers
#TEACHERSMELAVA
स्थानिक बातम्या
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्यवरांची उपस्थिती
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील अनधिकृत उत्खनन प्रकरणी मोठी कारवाई: अनमोल कांबळे आणि सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
-
फलटण शहर पोलीस स्टेशन येथे व्यावसायिकांच्या समवेत पोलीस प्रशासनाची बैठक
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
-
औंध पोलिस ठाण्याचा कारभार आता मा.अविनाश मते पाहणार.
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
-
केंद्रीय गृहमंत्री दक्षतापदक 2024 फलटण विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री राहुल धस यांना जाहीर.
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
-
पांचगणी मुख्याअधिकारी यांना उच्चन्यायलयाची नोटीस
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
-
सातारा नगर पालिकेच्या दोन अभियंत्यांची बदली
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
-
आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही
- Fri 1st Sep 2023 08:42 pm
-
माण तहसील कार्यालयातील तक्रारी अर्ज व्हायरल!
- Fri 1st Sep 2023 08:42 pm