माण तहसील कार्यालयातील तक्रारी अर्ज व्हायरल!

तहसीलदारांचे कर्मचाऱ्यांना अभय;समज देऊन प्रकरण ‘जेसे थे’

दहिवडी : गेल्या महिन्यापूर्वी माण तहसील कार्यालयातील बारनिशीत जमा केलेला तक्रारी अर्ज बारनिशीत गोपनीय राहत नसल्याचे समोर आले आहे.महसूल अंतर्गत येणाऱ्या तक्रारी कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने तहसीलदारांकडे केल्या जातात.परंतु गोपनीयतेचे नियम धुडकावून बारनिशीतील कर्मचारी तक्रारी अर्ज कारवाई होण्यापूर्वीच गोपनीय न ठेवता संबंधित कर्मचाऱ्यांकडून ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे.त्याच्याकडे व्हायरल केले जात आहेत.हे समजताच तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांना बोलावून समज दिली परंतु त्यांच्यावर कारवाई काय?

 

माणचे तहसीलदार विकास अहिर कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून पाठीशी घालत आहेत.कर्मचारी तक्रारी अर्ज जर व्हायरल करत असतील,तर तक्रारदाराने तक्रार करायची की नाही?,या कारणाने महसूलची दहशत सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.तहसील कार्यालय परिसरात कर्मचारी कामाव्यतिरिक्त फिरत असतात.माण खटावच्या उपविभागीय अधिकारी यांचे  कार्यालय,विविध महाविद्यालय,पोलीस स्टेशन,पंचायत समिती यांच्यासह अनेक महत्त्वाची तालुकास्तरीय कार्यालये दहिवडीतच आहेत.कामानिमित्त तालुक्यातील नागरिक मुख्यालय असणाऱ्या दहिवडीत येत असतात.सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामासाठी कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी होते.याची माहिती मिळूनही तहसीलदार अशा कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू असणारा महसूल विभाग नागरिकांचा गळा घोटण्याचे काम करत असल्याचे समोर येत आहे.टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय महसूलचे कर्मचारी कार्यान्वितच होत नाहीत.

 

तलाठी,महसूल सहाय्यक,क्लार्क नागरिकांना किरकोळ कामासाठीही पैशांच्या कारणास्तव हेलपाटे मारायला लावतात.गरिबांना दिल्या जाणाऱ्या रेशन धान्य पुरवठा विभागात तालुक्यातून येणाऱ्या लोकांची वर्दळ असते.परंतु किरकोळ कामांसाठीही त्या विभागात लाचेची मागणी केली जाते.महसूल मधील कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढत असतानाच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ माणच्या महसुल विभागाकडे लक्ष देणार का? असा सवाल माण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त