मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

महेश घुटुगडे शासकीय मशीनचा अनधिकृत ताबा घेत किंवा देत असल्याचा संशय; जिल्हा पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार?

मसूर :   ई-चलान मशीन लॉगिन करण्याचे अधिकृत अधिकार असलेल्या कर्मचाऱ्यांना अन्य ठिकाणी कर्तव्यावर पाठवून, त्यांच्या अनुपस्थितीत कस्टडीतील शासकीय ई-चलान मशीनचा वापर कोणाच्या परवानगीने केला जातो? मसूर फाटा येथे वाहतूक पोलिस निकम आणि तोतया वाहतूक पोलिस महेश घुटुगडे यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर आता मसूर पोलीस ठाण्यातील शासकीय वाहने आणि शस्त्रास्त्रे सारख्या साहित्याच्या सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे.


              उपलब्ध माहितीनुसार, ई-चलान लॉगिन अधिकार असलेले कर्मचारी अन्यत्र कर्तव्यावर नियुक्त करून त्यांच्या कस्टडीतील मशीन हजेरी मेजर महेश घुटुगडे यांच्या माध्यमातून स्वतःकडे घेतले अथवा निकम यांच्याकडे दिले जात होते का? मशीनच्या ताब्याची अधिकृत नोंद आहे का? आणि वरिष्ठांच्या आदेशांची अंमलबजावणी नेमकी कोण करणार? या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. ई-चलान मशीनचा वापर वाहनधारकांना थांबवण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला आहे. मात्र, हा प्रकार अधिकृत आदेशानुसार होता की अनधिकृतपणे, याची चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित सहायक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांच्या कार्यकाळातील ई-चालाण मशीन, शासकीय वाहने आणि शस्त्रास्त्रे वितरण, ताबा आणि वापराच्या नोंदी तपासण्याची आवश्यकता आहे.


               ई-चलान मशीन सारख्या शासकीय उपकरणाच्या ताबा आणि वापरावर नियंत्रण ठेवण्यात प्रभाऱ्यांकडून कथित अनियमितता होत असेल, तर पोलीस ठाण्याच्या कस्टडीतील पिस्तूल, रायफल आणि अन्य अग्निशस्त्रांच्या सुरक्षिततेबाबतही जिल्हा प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे.शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या ताब्याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचा आरोप सध्या नसला, तरी कस्टडीतील साहित्याच्या नियंत्रणाबाबत निष्काळजीपणा आढळल्यास त्याचे संभाव्य परिणाम गंभीर असू शकतात. त्यामुळे वाहनांसह शस्त्रास्त्रांच्या ताबा नोंदी, वितरण प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्था यांची नियमित तपासणी होते का, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.


            मसूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात आणि हजेरी मेजर महेश घुटुगडे यांच्या भूमिकेबाबत जिल्हा प्रशासनाने जलदगतीने निष्पक्ष चौकशी करून अनियमिता,  बेजबाबदारपणा किंवा अधिकाराचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाल्यास योग्य ती कारवाई करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे. ई-चलान मशीनच्या कथित गैरवापराकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात शासकीय वाहने आणि शस्त्रास्त्रे सुरक्षितते बाबतही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन संबंधित कस्टडी व्यवस्था, शासकीय साहित्याचे वितरण, ताबा आणि जबाबदारी याबाबतच्या नोंदीची तातडीने तपासणी करणे अपेक्षित आहे.एखादी गंभीर घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येण्यापेक्षा, वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक नाही का? शासकीय साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?


क्रमशः… भाग ५.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला