पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
आशपाक बागवान
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न सुरक्षा व मानदे कायद्याची पायमल्ली करत मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या एका व्यापाऱ्यावर काही महिन्यांपूर्वी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती वंदना विठ्ठलराव रूपनवर यांनी पुसेसावळी येथील ग्रामपंचायत शॉपिंग सेंटरमधील मे. पंकज ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकून तब्बल २७ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुक्का मावा जप्त केला. या प्रकरणी दुकानमालक याच्याविरुद्ध औंध पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायदा आणि भारतीय न्यायसंहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई कागदावर अत्यंत कठोर वाटत असली, तरी प्रत्यक्षात या कारवाईची शाई वाळण्यापूर्वीच पुसेसावळी आणि परिसरातील इतर होलसेल तसेच किरकोळ विक्रेत्यांनी पुन्हा आपले बस्तान मांडत बिनदिक्कतपणे प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू केली आहे. विशेष म्हणजे, आजही ही बेकायदा विक्री जोमात सुरू असतानाही प्रशासनाचे डोळे अजूनही उघडलेले नाहीत.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी टाकलेल्या या धाडीनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मात्र, ही कारवाई केवळ सोपस्कार ठरली की काय, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. या धाडीचा धाक उरलेला नसून,कारवाईनंतरही गुटख्याची खुली बाजारपेठ उघडपणे सुरूच असून पुसेसावळी परिसरात राजरोसपणे प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे.
औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका धडाकेबाज कारवाईतूनच जणू काहींना 'व्यवसायाची नवी प्रेरणा' मिळाली आहे! पुसेसावळीत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला खरा, पण या कारवाईने धास्तावण्या ऐवजी त्या व्यापाऱ्यासह परिसरातील इतर दोन चलाख होलसेलर व्यापाऱ्यांनी चक्क यातूनच 'व्यावसाय वृद्धीचा धडा' घेतल्याचे दिसतेय.
"कोणताही धंदा छोटा किंवा मोठा नसतो," या प्रसिद्ध फिल्मी संवादाला तंतोतंत फाटा देत या नव्या "रईस" ने अन्न व औषध प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या अगदी नाकावर ताजी मिरवणूक काढत आपला होलसेल गुटखा विक्रीचा व्यवसाय अजूनच जोमात वाढवला आहे. अधिकाऱ्यांच्या कागदी कारवाया आणि धाडींचा हा खेळ चालू असताना, पुसेसावळीत मात्र राजरोसपणे सुरू असलेल्या या नव्या गुटखा सम्राटाच्या भरभराटीची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे!
स्थानिक पातळीवर काही होलसेल व्यापारी थेट दोन ते तीन तालुक्यांमध्ये या प्रतिबंधित घातक पदार्थांचा बेकायदा पुरवठा करत असल्याची चर्चा आहे. एका बाजूला कारवाईचा बडगा दाखवायचा आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या साठवणूक व पुरवठ्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करायची, असा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. पुसेसावळीसह लगतच्या परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर वचक ठेवण्यात जिल्ह्याचे संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी नेमके का अपयशी ठरत आहेत? आणि या मूक संमतीमागे नेमके काय शिजतेय?अन्न सुरक्षा अधिकारी गप्प का? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
केवळ एका किरकोळ कारवाईचा देखावा करून मोठे रॅकेट सुरक्षित ठेवण्याच्या या 'अभिनव' उपक्रमामुळे अन्न सुरक्षा विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत... जयकुमार गोरेंचा तोच अहंकार भाजपला नडणार ?
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
वर्दीतील दर्दी! कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करणारे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर.
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
मसूर पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
संबंधित बातम्या
-
मसूर पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
-
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
-
फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 17th Nov 2026 12:13 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 17th Nov 2026 12:13 pm











