इन्स्टाग्राम वरून केलेली मैत्रिणीची मस्करी आणि पुढे अस घडलं.
Satara News Team
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
- बातमी शेयर करा
कोरेगाव : युवकाचा नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करीतून मैत्रिणीशी बोलने सुरु केले. पुढे बोलत बोलत मैत्रीण (तिच्या) युवकाच्या प्रेमात पडली. मात्र, युवकाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी संबंधित बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघदलेल्या युवतीशी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशन परिसरातील एका गावातील चोवीस वर्षीय युवती व दुसऱ्या गावातील एक मुलगी मैत्रिणी होत्या. या युवतीने मस्करीपोटी मनीष नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडले व आपल्या मैत्रिणीला फ्रेंड – रिक्वेस्ट पाठवली. मैत्रिणीने ती स्वीकारली व बनावट अकाउंटवरून एकमेकांशी संवाद सुरू झाला. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ती मैत्रीण मनीषला भेटण्यासाठी आग्रह करू लागल्याने बनावट खाते तयार करणाऱ्या युवतीची पंचाईत झाली.
भीतीपोटी तिने शिवम पाटील नावाने दुसरे बनावट खाते तयार केले. त्या माध्यमातून व मनीष याच्या खात्यावरून शिवम पाटील यांनी संबंधित मुलीला आपण मनीषचा वडील असल्याचे सांगून तो मृत झाला असल्याचे इन्स्टाग्रामवरूनच सांगितले. तसे दवाखान्यातील नकली फोटोही पाठवले. त्यामुळे या विरहातून चोवीस वर्षीय मुलीने १२ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद वाठारस्टेशन पोलिस ठाण्यात अकस्मात निधन म्हणून झाली होती
सातारा सायबर पोलिस व सायबर तज्ज्ञ जय इन्स्टाग्रामकडून गायकवाड यांनी या संदर्भातील माहिती मागवली. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चेष्टा-मस्करीमुळे एका मुलीचा नाहक बळी गेला. हा सर्व प्रकार करणाऱ्या संशयित युवतीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक सातव, भोसले, पोलिस कर्मचारी चव्हाण, देशमुख, इथापे यांच्यासह सातारा सायबर टीमने ही घटना उघडकीस आणली
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Tue 30th Jul 2024 06:14 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Tue 30th Jul 2024 06:14 pm













