तुम्हालाही भारत सरकारचा मेसेज आला का? घाबरू नका, जाणून घ्या कारण

सातारा  :वेळ सकाळी साडेदहाची... मोबाईल अचानक व्हायब्रेट होऊन मोठ्याने वाजू लागला. मोबाईलमधून नेहमीच्या रिंगटोनपेक्षा वेगळा आणि मोठा आवाज आला. नेमका हा आवाज कशाचा काहीच समजेना.... आपला मोबाईल हॅक झाला किंवा त्यातील डेटा चोरीला गेल्याच्या भीतीने नागरिक चिंताग्रस्त झाले. मात्र यात चिंता करण्यासारखे काही नसल्याचे समोर येत आहे. केंद्र अथवा राज्य सरकारने याबद्दल घोषणा केली आज सकाळपासून नागरिकांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून चाचणी इशाऱ्यासाठीचा मेसेज येत आहे. याची पूर्वकल्पना नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात "सातारा न्यूज" 'ने महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांच्याशी संवाद साधला असता, "अतिवृष्टीचा इशारा देण्यासाठी हा पॉपअप तयार करण्यात आला आहे. सर्व टेलिकॉम कंपनीतर्फे हा मेसेज करण्यात येतो आहे. काळजी करण्याचे किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही." असे स्पष्टीकण दिले आहे.

त्यामुळे ही संकल्पना नागरिकांच्या हितासाठीच अमलात आणण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जीवित हानीचा धोका वाढत चालला आहे. नागरिकांना अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थिती याची पूर्वकल्पना देण्यासाठी ही चाचणी करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला