कराडनजीक कारचा भीषण अपघात
Satara News Team
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
- बातमी शेयर करा
कराड : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा हद्दीत सोमवारी सकाळी एका सेंट्रो कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात कारने महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला जोरात धडक दिली. यामध्ये कारच्या पुढील बाजूच्या भागाचा चक्काचूर झाला तर आतील चार प्रवाशी जखमी झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी एका सेंट्रो कारमधून चार प्रवाशी कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. कार क्रमांक (एमएच १२ आरके ४०२१) ही कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या कारमध्ये एकूण चार प्रवाशी प्रवास करत होते. कार कराड नजीक पाचवड फाटा आटके गावच्या हद्दीत आली असता कारने महामार्गावर असलेल्या डिव्हायडरला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील पुढील बाजूचा चक्काचूर झाला.
अपघाताची घटना घडताच नागरिकांनी याची माहिती तत्काळ महामार्ग देखभाल विभागास दिली. तसेच अपघातातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी आणि पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेंच्या साहाय्याने कारला बाहेर काढत महामार्गाच्या बाजूला नेले. या अपघाताची चौकशी करण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.
स्थानिक बातम्या
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Mon 1st Apr 2024 02:48 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Mon 1st Apr 2024 02:48 pm













