इमारतीवरून ढकलून देऊन हत्या करणाऱ्या प्रियकरास अटक; 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
- Satara News Team
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
- बातमी शेयर करा
कराड : दुसऱ्या मुलाशी अफेअर असल्याच्या संशयावरून प्रेयसी आरूषी मिश्रा हिला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकराला आज शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांनी संशयितास दि. ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ध्रुव राजेशकुमार छिक्कारा, असं त्याचं नाव आह
वाद विकोपाला गेल्यानंतर तरुणीला दिलं ढकलून
मृत तरूणी आरूषी मिश्रा ही मूळची बिहारमधील मुजफ्फरपूरची रहिवासी होती. सध्या ती कराडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. संशयित ध्रुव छिक्कारा हा देखील वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. तो मलकापुराया सनसिटीमध्ये रहात होता. सोमवारी त्याने आरूषीला त्याया फ्लॅटवर बोलवले. आरूषी फ्लॅटवर गेल्यावर सायंकाळी दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने संशयिताने तिला गॅलरीतून ढकलून दिले. तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आरूषीचा जागीच मृत्यू झाला.
संशयितास 3 दिवस पोलीस कोठडी
कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरुषीला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. याप्रकरणी आरुषीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून ध्रुव छिक्कारा याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, घटनेवेळी ध्रुव याच्या पायाला इजा झाली आहे. त्याच अवस्थेत त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने तीन दिवस कोठडी दिली.
मला काही सांगायचंय…
रिमांडची सुनावणी झाल्यानंतर संशयित ध्रुवने आपल्याला काही सांगायचे असल्याची विनंती केली. त्यानंतर न्यायाधीशांनी सर्वांना कोटातून बाहेर जाण्यास सांगितलं. मग ध्रुव छिक्काराने एकांतात आपलं म्हणणं न्यायाधीशांसमोर मांडलं. त्याने नेमकं काय सांगितलं, हे मात्र समजू शकलं नाही.
#karad
#krishnahospital
स्थानिक बातम्या
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असतानाच ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा अपघाती मृत्यू
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
जिल्ह्यात बारा वाजेपर्यंत मतदान संत गतीनेच
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
शरद पवारांनी त्या काळात काँग्रेस फोडली ती गद्दारी नव्हती का ? ...उदयनराजे
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
255 फलटण विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा सुसज्ज
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
संबंधित बातम्या
-
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
-
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
-
बोरगाव पोलीसांकडून 2 सराईत गुन्हेगार सातारा जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
-
गोंदवले बु.!! येथील खून प्रकरणातील फरार सर्व आरोपींना अटक....
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
-
गोंदवले बु!! येथे शेतात ट्रॅक्टर घेऊन जायचे नाही म्हणत लाकडी काठीने मारहाण,
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
-
जावई अन् सासऱ्यानेच चोरले ओगलेवाडीतील 110 तोळे सोने
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
-
लक्ष्मीपूजनासाठी घरी आणलेले ११० तोळ्यांचे दागिने चोरीस
- Sat 3rd Aug 2024 11:53 am
-
साताऱ्यातील शेंद्रेजवळील सोनगाव तर्फमध्ये 95 लाखांची रोकड जप्त
- Sat 3rd Aug 2024 11:53 am