कुडाळ मुस्लीम समाज शुक्रवारी ईद साजरी करणार

सातारा  :  या वर्षी आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण योगायोगाने एकाच दिवशी आले आहेत, त्या सणांचे पावित्र्य राखून शांततेने सण साजरे करावेत, .सर्व समाजाने एकोप्याने रहावे. जावळी तालुका हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जाते,तो सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न  करावे
प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे सर्वप्रथम आपण भारतीय आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, सामाजिक सदभावना जपली पाहिजे, आम्ही भारतीय आहोत हा सार्थ अभिमान जपला पाहिजे, जावळी तालुका हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा आहे. कुडाळ मुस्लिम  सामाजिक सलोखा आषाढी एकादशी व बकरी ईद सण पावित्र्य राखून साजरे केले जातील. असे आव्हान कुडाळ मुस्लिम समाज यांच्यातर्फे करण्यात आले. 
 कुडाळ मुस्लिम समाजाने निर्णय घेतला असून दोन्ही सणांचे पावित्र्य राखून बकरी ईद साजरी करू अशी ग्वाही उपस्थित मुस्लिम बांधवांनी दिला 

सर्वांनी जात धर्म न बघता मानव हा एकच धर्म आहे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली तर समाजात तेढ निर्माण होणार नाही असे सांगितले.

या दिवशी सार्वजनिक कुर्बानी देणार नाही, न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही सणांचे पावित्र्य राखून बकरी ईद साजरी करू अशी वाही उपस्थित  कुडाळ मुस्लिम बांधवांनी दिली.

कुडाळ येथिल मुस्लीम बांधव व मुस्लीम जमात हे उद्या महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांचे दैवत विठ्ठल- रखुमाई, आषाढी एकादशी निमीत्त याच दिवशी ईद आल्यामुळे गुरुवारी फक्त नमाज पठण केलेली आसुन शुक्रवारी ईदचा बकर्याची कुर्बाणीचा सण साजरा करणार आसल्याचे मुस्लीम समाज्याचे अध्यक्ष साबिर भाई पठाण, हाजी अब्दुल अजीज मुजावर ,बशीर डांगे, नसीर डांगे, हाजी शब्बीर भाई शेख, मोहसीन शेख, आसिफ मणेर, अरमान डांगे, अमन पठाण, वसीम शेख, आयुब शेख, महमूद शेख, रमजान पठाण, अलीम डांगे, कुडाळ मुस्लिम समाज  यांच्यावतीने सांगण्यात आले. 

कुडाळ मुस्लिम समाज बांधवानी मेढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष तासगावकर , यांच्या मार्गदर्शनाखाली  कुडाळ पोलीस स्टेशन   कॉन्स्टेबल सुनील रोकडे, नंदकुमार कचरे सागर,भुजबळयांना यांना भेटून निवेदन देत बकर्याची कुर्बाणी गुरुवारी  देणार नसल्याचे निवेदन देऊन सांगण्यात आले. दोन्ही सणांचे पावित्र्य राखून बकरी ईद साजरी करू अशी ग्वाही उपस्थित कुडाळ मुस्लिम समाजाने दिली.

 मुस्लिम समाजाने घेतल्या यां नि स्वार्थी निर्णयाचे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेममन सौरभ बाबा शिंदे यासह कुडाळच्या तमाम ग्रामस्थांकडून या निर्णयाचे कौतुकही होत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला