सदरबझार येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

सातारा : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सदरबझार सातारा येथील भारतमाता चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती आणि श्री. भवानी महिला ग्रुप सदरबझार यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.   
  यावेळी शाहीर शुभम भूतकर यांच्या पोवाड्यांचे सादरीकरण झाले तसेच विविध पारंपरिक खेळांचे देखील प्रात्यक्षिक याठिकाणी पार पडले. महिला व पुरुष मंडळी यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांचे श्री भवानी महिला ग्रुपच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणूक पार पडल्यानंतर आयोजकांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 


 हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती, सदरबाजार साताराचे सदस्य राहुल किर्दत, किरण जगदाळे,श्री . संदीप साखरे , सिद्धराज किर्दत, मिथुन फुटाणे, विशाल पवार, अजिंक्य सपकाळ तसेच श्री भवानी महिला ग्रुप, सदरबाजार साताराच्या संस्थापिका सौ. कांचनताई घोडके, सदस्य श्रीमती. टंगसाळे, सौ. नंदा कदम, सौ. वैशाली मेहता,सौ. कुर्लेकर, सौ, नायकवडे, सौ, अश्विनी कांबळे, सौ. पूजा कवठेकर, सौ. भनंगे, सौ. विमल माळवदे, आदी, पदाधिकारी आणि सदस्यांनी मेहनत घेतली.

 

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला