एक वर्षाच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकून चिमुकलीचा मृत्यू
साताऱ्यातील दुर्दैवी घटनाSatara News Team
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून, जेली चॉकलेट घशात अडकल्याने एक वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. मुलीच्या आईने चिमुकलीला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच चिमुकलीने आपला जीव सोडला. शर्वरी सुधीर जाधव (रा. कर्मवीरनगर, कोडोली सातारा) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील कर्मवीरनगरामध्ये काल, रविवारी (दि.२५) रात्रीच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिमुकल्या शर्वरीला तिच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने जेली चॉकलेट खाण्यास दिले. हे चॉकलेट तिने स्वत: गिळले. परंतु चॉकलेट तिच्या घशात अडकल्याने ती खोकू लागली. यानंतर ती बेशुद्ध पडली. तिच्या आर्इच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी घराशेजारी राहणारे देवबा जाधव यांना बोलावून घेतले. त्यांनी तातडीने शर्वरीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी तिला तपासले असता ती मृत झाल्याचे समजले. घशात चॉकलेट अडकून मुलीचा मृत्यू झाल्याने तिच्या आईने आक्रोश केला. या मातेचा आक्रोश अक्षरश:काळीज पिळवटून टाकणारा होता.सातारा शहर पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 26th Dec 2022 02:32 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 26th Dec 2022 02:32 pm













