जावळी कन्या प्राची संकपाळ झाली पोलीस सब इन्स्पेक्टर

मेढा : मेढा गावचे स्थायिक असलेले ,मूळचे महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आहीर गावच्या सर्जे कुळातील वै.वा.ह. भ.प.नारायराव रामचंद्र संकपाळ (सर्कल) यांची नात, स्टॅपव्हेंडर श्री-ज्ञानेश्वर संकपाळ यांची कन्या कुमारी प्राची संकपाळ हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यशसंपादन केले असून, महिला EWS प्रवर्गातून पोलीस सब इन्स्पेक्टर पदासाठी महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला आहे. कु. प्राचीचे सर्व स्थरातून अभिनंदन होत असून जावळी तालुक्याची मान तिने उंचावली आहे.प्राची संकपाळ हीचे प्राथमिक शिक्षण मेरी एंजल्स स्कुल आखाडे तसेच उच्च शिक्षण इंदिरा कॉलेज ऑफ इंजनिअरींग पुणे येथे झाले असून, आपली जिद्य व चिकाटी न सोडता आपल्या अफाट इच्छाशक्तीवर तीने सन २०१९ पासून MPSC परिक्षेचा अभ्यास केला यामध्ये सातारा येथील कृषी गंगा कलास तसेच सातारा येथील वाचनालयात दिवस रात्र अभ्यास करून सेल्फ स्टडी केला व अखेर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाली. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आर्थिक दुर्बल-ईडब्ल्युएसच्या प्रवर्गातून. कुमारी प्राची ज्ञानेश्वर संकपाळ हीने महाराष्ट्र राज्यात प्रथम रँक मिळवीला आहे.कुमारी प्राचीच्या निवडी बघल तीच्या कुटुंबाने अभिनंदनीय मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला आहे. तीच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब,, सातारचे खासदार छत्रपती श्री.उदयनराजे भोसले साहेब, सातारा जावलीचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले,  आकाश कदम  मित्र परिवार व कृषिगंगा मित्र परिवार यांनी तीचे अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त