सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे उत्स्फूर्तपणे पंढरपूरकडे प्रस्थान 

 गेल्या दोन वर्षाच्या महामारीनंतर आषाढी वारीस यावर्षी प्रशासनाने परवानगी दिल्याने यावर्षी वारकरी संप्रदायांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे यावर्षी या वारीमध्ये महिला सह हजारो वारकऱ्यांचे दिंडीमध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेतला

 सातारा न्यूज पुसेगाव  : टाळ मृदुंगाच्या तालावर पाऊले चालती पंढरीची वाट... ज्ञानोबा माऊली तुकाराम श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषाचा गजर विद्यार्थ्यांच्या रंगीबेरंगी वारकरी वेशातील उपस्थिती दिंडीच्या तालावरील धरलेला सूर हाती दिंड्या पथका घेऊन मोठ्या उत्स्फूर्तपणे व आनंदी व भक्तिमय वातावरणामध्ये तीर्थक्षेत्र सुवर्णनगरी पुसेगाव येथून परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
.    गेल्या दोन वर्षाच्या महामारीनंतर आषाढी वारीस यावर्षी प्रशासनाने परवानगी दिल्याने यावर्षी वारकरी संप्रदायांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे यावर्षी या वारीमध्ये महिला सह हजारो वारकऱ्यांचे दिंडीमध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेतला होता. श्री सेवागिरी देवस्थान च्या पायी दिंडी सोहळ्याचे यंदाचे 27 वे वर्ष आहे. श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज व सेवागिरी महाराजांचे प्रतिमेचे श्री सेवागिरी महाराजांच्या पादुकांच्या आणि पालखी दिंडी रथाचे मंत्र घोषात विधिवत पूजन केले. याप्रसंगी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट चेअरमन संतोष जाधव विश्वस्त गौरव जाधव संतोष वाघ सचिन देशमुख डॉक्टर सुरेश जाधव रणधीर जाधव सरपंच विजय मसणे उपसरपंच पृथ्वीराज जाधव माझी चेअरमन एडवोकेट विजयराव जाधव जगनशेठ जाधव पालखी सोहळा प्रमुख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थांची लक्षणीय  उपस्थिती होती. श्री सेवागिरी महाराजांची मूर्ती विराजमान असलेला आणि फुलांच्या माळांनी सजवलेला दिंडी रथ मंदिरापासून बाजारपेठे मार्गे एसटी बस स्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेण्यात आला. दिंडीचा पहिला मुक्काम महिमानगड  येथे होणार आहे.

यानंतर रविवार दिनांक 3 जुलै रोजी सोमवार दिनांक चार मसवड मंगळवार दिनांक 5 पी लिहू बुधवार दिनांक सहा भाळवणी गुरुवार दिनांक 7 उपरी शुक्रवार दिनांक आठ वाखरी शनिवार दिनांक 9 पंढरपूर मुक्कामी दिनांक 10 जुलैला आषाढी एकादशी आहे सोमवार दिनांक दिंडीचे पुसेगाव कडे प्रस्थान होईल.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त