नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
Satara News Team
- Fri 20th Dec 2024 05:54 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवार दि. 22 रोजी साताऱ्यात आगमन होणार असून यानिमित्ताने त्यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
सातारा- पुणे महामार्गावर निरा नदी पुलाजवळ ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे रविवारी सकाळी 10 वाजता आगमन होणार असून तेथून सताऱ्याच्या दिशेने भव्य रॅली निघणार आहे. महामार्गावर निरा नदी पूल ते शिरवळ, खंडाळा, भुईंज, पाचवड मार्गे कुडाळ, करहर ते मेढा, मेढ्यातून मोळाचा ओढा ते करंजे ते शिवतीर्थ पोवई नाका येथे दुपारी 4 वाजता शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. याठिकाणी सर्व सातारकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोवई नाक्यावरून वाय. सी. कॉलेज मार्गे गोडोली, विलासपूर मार्गे अजिंक्यतारा कारखाना अशी रॅली जाणार असून त्याठिकाणी स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यात येणार आहे. शेंद्रे येथून बोगदा मार्गे समर्थ मंदिर, राजवाडा ते सुरुची बंगलो अशी रॅली होणार आहे. या रॅलीत निरा पूल येथे सर्व कार्यकर्त्यांनी आपली चारचाकी वाहने घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व पदाधिकारी, सातारा- जावलीतील ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 20th Dec 2024 05:54 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 20th Dec 2024 05:54 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 20th Dec 2024 05:54 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 20th Dec 2024 05:54 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 20th Dec 2024 05:54 pm
संबंधित बातम्या
-
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 20th Dec 2024 05:54 pm
-
प्रशांत खुसे-पाटील यांच्या रुपाने खटाव तालुक्याला मिळणार युवा नेतृत्व
- Fri 20th Dec 2024 05:54 pm
-
साताऱ्यात शिवसेना (उबाठा) आंदोलनाचा फुसका बार
- Fri 20th Dec 2024 05:54 pm
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Fri 20th Dec 2024 05:54 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Fri 20th Dec 2024 05:54 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Fri 20th Dec 2024 05:54 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 20th Dec 2024 05:54 pm












