जिल्ह्यातील २२३ शाळा मॉडेल स्कूल करण्यात येणार....मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

सातारा : जिल्ह्यातील २२३ शाळा मॉडेल स्कूल करण्यात येणार आहेत. यासाठी भरीव निधीचीही तरतूद झाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी काम सुरू आहे. सेमी इंग्रजीचे शिक्षण, संगणकाचे ज्ञान कसे देता येईल, याबाबतचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.

जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

नागराजन म्हणाल्या, ‘‘राज्य शासनाने काही प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत २०२२-२३ वर्षात जिल्ह्यातील २३ शाळांची निवड करण्यात आली होती.

यामध्ये २०२३-२४ वर्षात २७ शाळांची वाढ झाली, तर २०२४-२५ वर्षातही आणखी १७३ शाळांची मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली. सध्या एकूण २२३ शाळांचा विकास मॉडेल स्कूल म्हणून करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

यासाठी भरीव निधीची तरतूद केलेली आहे. या मॉडेल स्कूलअंतर्गत सर्व भौतिक सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये वर्गखोल्या, शालेय स्वच्छतागृह, संरक्षण भिंत, जलपुनर्भरण, स्वागत कमान, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, शालेय ग्रंथालय, सोलर पॅनल, किचन शेड, परसबाग आदींचा समावेश असणार आहे.’’

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा परिषद शाळेत दर शनिवारी दप्तराविना शाळा उपक्रम असणार आहे. या दिवशीही काय करायचे, याचेही नियोजन करण्यात आले आहे.

- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त