मलकापूर-आगाशिवनगर परिसरातून देशी बनावटीचे पिस्टल अन् काडतुसासह युवकास अटक
Satara News Team
- Thu 8th Feb 2024 11:44 am
- बातमी शेयर करा
कराड : कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मलकापूर-आगाशिवनगर परिसरातुन एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह एका युवकास अटक केली आहे. लवराज रामचंद्र दुर्गावळे (वय 29, रा. आगाशिवनगर- मलकापुर), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 60 हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, आगाशिवनगरमधील इमर्सन कंपनी जवळ एक युवक देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकास माहिती देवून तात्काळ कारवाई करण्यास सांगितले.
डीबी पथकाने इमर्सन कंपनी शेजारी सापळा रचला. त्यानंतर तेथे आलेल्या एका संशयित युवकाला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक देशी बनावटीची मॅगझिन सह पिस्टल व जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील, उपनिरीक्षक अझरूद्दीन शेख, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे. महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 8th Feb 2024 11:44 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 8th Feb 2024 11:44 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 8th Feb 2024 11:44 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 8th Feb 2024 11:44 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 8th Feb 2024 11:44 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Feb 2024 11:44 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Feb 2024 11:44 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 8th Feb 2024 11:44 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 8th Feb 2024 11:44 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 8th Feb 2024 11:44 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 8th Feb 2024 11:44 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 8th Feb 2024 11:44 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 8th Feb 2024 11:44 am













