सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 40 किलो प्लास्टिक जप्त
प्रकाश शिंदे - Wed 20th Jul 2022 12:03 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने सिंगल युज प्लास्टिक बंदीची कारवाई नेटाने पुढे चालवली आहे. दररोज सातारा शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन दुकानांची तपासणी करण्याच्या मोहिमेमुळे व्यापारी आणि दुकानदारांचे चांगलेच धाबे दणाणले.
मंगळवारी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राजवाडा परिसरात 35 दुकानांची तपासणी करून चाळीस किलो प्लास्टिक जप्त केले. या संदर्भात आरोग्य विभागाचे मुख्य निरीक्षक प्रकाश राठोड यांनी यासंदर्भात ही मोहीम पुढे सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्याचे प्रदूषण टाळण्यासाठी राज्य शासनाने नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकाऱ्यांना सिंगल युज प्लास्टिक बंदी जाहीर करून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सातारा पालिकेने गेल्या चार दिवसांमध्ये सातत्याने कारवाई करून सुमारे 100 किलो पेक्षा अधिक प्लास्टिक जप्त केले आहे.
मंगळवारी सायंकाळी चारच्या नंतर आरोग्य विभागाने पुन्हा राजवाडा परिसरातील दुकानांची तपासणी मोहीम हाती घेतली. यामध्ये आरोग्य निरीक्षक प्रशांत गंजीवाले, मुकादम संदीप पाठपुते, तुकाराम खंडजोडे, आकाश आवळे, कपिल व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
satara
sataracrime
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 20th Jul 2022 12:03 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 20th Jul 2022 12:03 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 20th Jul 2022 12:03 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 20th Jul 2022 12:03 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 20th Jul 2022 12:03 pm
संबंधित बातम्या
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 20th Jul 2022 12:03 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Wed 20th Jul 2022 12:03 pm
-
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 20th Jul 2022 12:03 pm
-
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Wed 20th Jul 2022 12:03 pm
-
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Wed 20th Jul 2022 12:03 pm
-
महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार आता छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये
- Wed 20th Jul 2022 12:03 pm
-
फलटणला अन्न व औषध प्रशासन सातारा यांच्या कारवाईची प्रतीक्षा.
- Wed 20th Jul 2022 12:03 pm











