ओ ताई..! ओ आक्का..! भाजी घ्या भाजी.. अपशिंगेत ए एसपीच्या शाळेत भरला बालबाजार.

देशमुखनगर : ओ ताई...! ओ आक्का..! ओ मामा..! ओ काका..! भाजी घ्या भाजी हे बोल आहेत ए एसपी कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल अपशिंगे ता. सातारा येथील विद्यालयातील बाल विक्रेत्यांचा, चिमुकल्या मुलांनी आपापल्या वस्तू बाजारामध्ये फळे, भाजीपाला, खेळणी, सौदर्य प्रसाधने, स्टेशनरी, खाद्यपदार्थ, धान्याचे विविध प्रकार, सेंद्रिय पदार्थ, हॉटेल्स, विविध प्रकारचे स्टॉल विक्रीसाठी मांडली होती. या विकण्यासाठी अनेक क्लुप्त्या करून आपला माल कसा संपेल हि काळजी विद्यार्थी घेत होते, या बालबाजारातून मुलांना व्यवहारज्ञान, तसेच गणिती क्रियांचे प्रात्यक्षिक करण्याची संधि मिळते. नफा तोटा याबाबतची संकल्पना स्पष्ट होते, संवाद कौशल्य वाढते, जाहिराती कशी करावी याचे ज्ञान मिळते आशा अनेक बाबीतून मुलांना आनंदही मिळतो. या बालबाजारात जवळ जवळ शंभर स्टॉल होते. बाजारातून ९० हजारांची उलाढाल झाली, माजी उपसरपंच राजश्री करांडे, डॉ. विनय साळुंखे, महिला पालक सुनदा घोरपडे, गौरी निकम, ज्योती घोरपडे, कोमर कणसे, यांच्या हस्ते ए एस पी बझारचे उदघाटन करण्यात आले.


संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण निकम, महेंद्र निकम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हा उपक्रम पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला