सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील काताळकेवाडी येथील जवान चंद्रकांत जाधव शहीद

शहीद जवान चंद्रकांत जाधव यांचे पार्थिव उद्या येणार असल्याची माहिती 
शहीद चंद्रकांत जाधव यांनी 24 वर्ष फौज मध्ये देश सेवा केली असून त्यांची पोस्टिंग चंदी  मंदिर पंजाब येथे होती ते चंदी मंदिर वरून पंजाब येथे जात असताना त्यांना वाटेत अस्वस्थ  व्हायला लागले आपली सेवा बजावीत असतानाच त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 सातारा न्यूज -पुसेगाव : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील  काताळकेवाडी  येथील 144 AAd रेजिमेंटचे जवान चंद्रकांत प्रभाकर जाधव वय 44 वर्षे आपली सेवा बजावीत असताना पंजाब चंदी मंदिर येथे त्यांना वीर मरण आले त्यांचे पार्थिव उद्या दिनांक 3 रोजी  काताळगेवाडी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे बंधू धनाजी प्रभाकर जाधव यांनी दिली आहे.
.    शहीद चंद्रकांत जाधव यांनी 24 वर्ष फौज मध्ये देश सेवा केली असून त्यांची पोस्टिंग चंदी  मंदिर पंजाब येथे होती ते चंदी मंदिर वरून पंजाब येथे जात असताना त्यांना वाटेत अस्वस्थ  व्हायला लागले आपली सेवा बजावीत असतानाच त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने निधन आले. त्यांच्या पश्चात आई-वडील तीन भाऊ पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कातळकेवाडी सह खटाव तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


. शहीद जवान चंद्रकांत जाधव यांचे एकली ते चौथी शिक्षण काताळकेवाडी येथे तर चौथी ते दहावी शिक्षण निढळ येथे झाले व अकरावी बारावीचे शिक्षण महिमानगड विद्यालयात झाले. त्यानंतर ते फौज मध्ये भरती झाले. त्यांचे वडील व दोन भाऊ तेहि फौज मध्ये देश सेवा करीत आहेत. त्यांचा स्वभाव शांत संयमी मनमिळावूअसा होता. ते कातळगेवाडी व सर्व परिसरामध्ये त्यांचे विषयी आदर होता. त्यांच्या जाण्याने काताळगेवाडी येथे मोठी पोकळी निर्माण झाली असून कातळगेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. शहीद जवान  चंद्रकांत जाधव यांचे उद्या पार्थिव येणार असल्याची माहिती त्यांचे बंधू धनाजी जाधव यांनी दिली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला