शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप विजयकुमार भुजबळ यांची निवड..

सातारा : प्रत्येक वर्षी शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप शिक्षण साठी महाराष्ट्र राज्यातील 20 प्राथमिक शिक्षकांसाठी आणि 10 माध्यमिक शिक्षकांसाठी दिली जाते. यावर्षी सातारा जिल्ह्यातून विजयकुमार किसन भुजबळ उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर यांची निवड झाली आहे, भुजबळ यांच्या आर्मी मुलींची लढाई संकटाशी या उपक्रमासाठी निवड झाली आहे. 

. भुजबळ सर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतात. शरदचंद्र पवार फेलोशिप साठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे , भुजबळ हे तंत्रस्नेही शिक्षक असून vkbeducation.com ही वेबसाईट शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. शिक्षकांच्या प्रश्नासाठी भुजबळ हे कार्यरत असून अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस आहेत. 

कोरेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले असून शिक्षण विस्ताराधिकारी वनिता मोरे, मनीषा चंदुरे, सीमा बर्गे, संगीता नलावडे, केंद्रप्रमुख अनिता सूर्यवंशी, मुख्याध्यापिका मंगल शिंदे,आणि रेखा पवार, वृषाली घोरपडे, वैशाली बागाव, सारिका टंकसाळे, अश्विनी कुंभार, रेश्मा बागडे या सहकारी शिक्षकांचे सहकार्य लाभले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला