लॉटरी पध्दतीने स्वयंसहायता बचत गटाची मिनी ट्रक्टरसाठी निवड

सातारा : सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 6 डिसेंबर 2012 रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येते.
            या योजने अंतर्गत सातारा जिल्हा कार्यालयाकडे सन 2018.19 ते सन 2022.23 अखेर एकूण 51 बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळणेकामी विहित नमुन्यातील अर्जाव्दारे प्रस्ताव दाखल केलेले होते. छाननीअंती 43 बचत गटांचे प्रस्ताव परिपुर्ण आढळून आलेले होते. त्यानुसार दि. 25 मार्च 2023 रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सातारा येथे बचत गटांच्या प्रतिनिधींसमवेत लॉटरीव्दारे सोडत आयोजित करण्यात आलेली होती. त्यानुसार सातारा जिल्हयातील 20 बचत गटांची लॉटरीव्दारे अंतिम निवड करण्यात आलेली असून उर्वरीत 23 बचत गट प्रतिक्षासूचीवर ठेवण्यात आलेले आहेत. अंतिम निवड करण्यात आलेल्या 20 बचत गटांना मंजूर लाभाची रक्कम लवकरात लवकर संबंधीत बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग केली जाणार आहे. प्रतिक्षासूचीवरील बचत गटांना शासनाकडून जस-जसे अनुदान उपलब्ध होईल, त्याप्रमाणे मंजूर लाभाची रक्कम संबंधीत बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग केली जाईल. मात्र, सन 2018.19 ते सन 2022.23 अखेर प्रतिक्षासूचीवरील बचत गटांचा दि. 31 मार्च 2023 पर्यंतच विचार केला जाईल. प्रतिक्षासूचीवरील बचत गटांसाठी सन 2022.23 या वर्षअखेरीस अनुदान उपलब्ध न झाल्यास संबंधित बचत गटांनी पुढील आर्थिक वर्षामध्ये नव्याने प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक राहील, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. नितीन उबाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे नमूद केलेले आहे.

(नितीन उबाळे)
सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण, सातारा.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!

स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!

मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक

मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक

हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला