महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

सातारा : सातारा पंचायत समितीचे सभापती मा. महेश गाडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सैदापूर येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, शैक्षणिक साहित्य तसेच छत्र्यांचे वाटप केले. त्यांच्या हस्ते झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणासाठी आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती पुन्हा एकदा आली.

यावेळी महेश गाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण हेच भविष्यातील यशाचे भक्कम साधन असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. पावसाळ्यात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने छत्र्यांचे वितरणही करण्यात आले.

या कार्यक्रमास सैदापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शितल पवार, कोंडवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किरण गाडे, सैदापूरचे माजी सरपंच यशवंत पवार, सुरेश पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार, ग्रामपंचायत सदस्य नामदेव राठोड, ग्रामविकास अधिकारी सौ. धाराशिवकर यांच्यासह शाळेच्या उपशिक्षिका तमन्ना अत्तार आणि उपशिक्षक अजितकुमार फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा प्रशासन, शिक्षकवृंद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. महेश गाडे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळाला असून ग्रामीण भागातील शिक्षणाला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला