कास पठारावरील हाॅटेल बांधकाम अधिकृत करण्याची स्थानिकांची मागणी

Locals demand to authorize construction of hotels on Kas Plateau

सातारा  : कास पठार आणि परिसरातील स्थानिक भूमिपुत्र नागरिकांनी उभारण्यात आलेली हॉटेल ही अधिकृत करण्याची मागणीसाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.सातारा तहसीलदार यांनी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बांधकामांना नोटीस देऊन कारवाई करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्या विरोधात आज स्थानिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.कास येथील स्थानिक रहिवाशी रामचंद्र उंबरकर म्हणाले, प्रशासनाच्या वतीने अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या सूचना स्थानिक व्यवसायिकांना दिल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. येथील स्थानिक नागरिक, व्यावसायिक भीतीच्या छायेखाली आहे. स्थानिक नागरिकांनी आपल्या मालकीच्या जागेत हॉटेल व्यवसाय उभारले आहेत. त्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे, तर काही मोठ्या उद्योजकांनी गुंतवणूक करून हॉटेल व्यवसाय उभे केले आहेत. त्यातून स्थानिक युवकांना आणि महिला, पुरुषांना रोजगार संधी मिळत आहे.भूमिपुत्र संस्थेचे अध्यक्ष रामदास कार्वे म्हणाले, या बांधकामापासून पर्यावरणास कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, असे कृत्य आम्ही करणार नाही. प्रशासनाने योग्य नियमावली तयार करून काही बंधनकारक नियम लागू करून कायदेशीररित्या या ठिकाणी असलेले हॉटेल व्यवसाय अधिकृत करावेत, अशी मागणी स्थानिक व्यवसायाकांनी निवेदनाद्वारे केली आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त