पब्जी प्रकरणात मैत्रिणीच्या नातेवाइकांनी तरुणाला धू-धू धुतला.तरुणीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल
- Satara News Team
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
- बातमी शेयर करा
सातारा : पब्जी खेळातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा काल शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता याबाबत आज सातारा शहर पोलीस ठाण्यात मुलीचा चुलत भाऊ दोन काका यांच्यासह पाच जनावर गुन्हा दाखल झाला आहे
घरातून सकाळी महाविद्यालयात जाते, असे सांगून बाहेर पडलेली तरुणी सकाळी-सकाळीच लॉजवर मित्रासोबत निघाली होती. मात्र, लॉजसमोरच घरातल्यांनी तिला रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिच्या मित्राला अक्षरश: त्यांनी धू-धू धुतलं. एवढेच नव्हे तर कारमध्ये घालून कास पठारावरही नेलं. या ठिकाणी एका शेतात पालथं झोपवून त्याला बेल्टने बेदम मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तरुणीचा चुलत भाऊ, दोन काका यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी १९ वर्षांची असून, तिचा मित्र उवैश नसीम अंसारी (वय २०) हा उत्तर प्रदेशमध्ये राहतो. पब्जी खेळत असताना दोघांची ओळख झाली. सोमवार, दि. ४ रोजी सकाळी ८ वाजता पीडित तरुणी आणि उवैश हा सातारा शहरातील एका लॉजवर निघाले होते. तरुणीच्या घरातल्यांना तिची शंका आल्याने त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. तिचा पाठलाग करत तिचा चुलत भाऊ, दोन काका लाॅजपर्यंत पोहोचले. यावेळी तरुणी आणि तिचा मित्र उवैश हा लाॅजमध्ये निघाले होते. तत्पूर्वीच घरातल्यांनी दोघांनाही रंगेहाथ पकडले. तिच्या मित्राला त्यांनी बेदम मारहाण केली.
त्यानंतर कारमध्ये घालून कास पठार परिसरात नेले. या ठिकाणी रस्त्याच्याकडेला गाडी उभी करून उवैशला एका शेतात नेले. या ठिकाणी त्याला पालथे झोपवून त्याच्या पाठीवर, पायावर बेल्टने बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर त्याला घेऊन संबंधित नातेवाईक सातारा शहर पोलिस ठाण्यात आले. त्या तरुणीच्या फिर्यादीनुसार उवैशवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.उवैश हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. उत्तर प्रदेशहून तो तरुणीला भेटण्यासाठी साताऱ्यात आला होता. मात्र, तरुणीच्या घरातल्यांनी त्याला पकडल्याने तो सध्या जेलची हवा खात आहे. त्याच्या आई-वडिलांनाही या प्रकाराची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे. परंतु अद्यापही कोणी आले नाही.
दरम्यान, नातेवाइकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या उवैशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला. त्याच्या जबाबानुसार पोलिसांनी तरुणीचा चुलत भाऊ, लहान व मोठे काका यांच्यासह अनोळखी दोघांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. सध्या उवैश अंसारी हा पोलिसांच्या कोठडीत आहे.
स्थानिक बातम्या
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असतानाच ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा अपघाती मृत्यू
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
जिल्ह्यात बारा वाजेपर्यंत मतदान संत गतीनेच
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
शरद पवारांनी त्या काळात काँग्रेस फोडली ती गद्दारी नव्हती का ? ...उदयनराजे
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
255 फलटण विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा सुसज्ज
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
संबंधित बातम्या
-
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
-
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
-
बोरगाव पोलीसांकडून 2 सराईत गुन्हेगार सातारा जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
-
गोंदवले बु.!! येथील खून प्रकरणातील फरार सर्व आरोपींना अटक....
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
-
गोंदवले बु!! येथे शेतात ट्रॅक्टर घेऊन जायचे नाही म्हणत लाकडी काठीने मारहाण,
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
-
जावई अन् सासऱ्यानेच चोरले ओगलेवाडीतील 110 तोळे सोने
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
-
लक्ष्मीपूजनासाठी घरी आणलेले ११० तोळ्यांचे दागिने चोरीस
- Thu 7th Dec 2023 09:51 pm
-
साताऱ्यातील शेंद्रेजवळील सोनगाव तर्फमध्ये 95 लाखांची रोकड जप्त
- Thu 7th Dec 2023 09:51 pm