कासच्या सांडव्यावर जीवघेणा सेल्फी
प्रकाश शिंदे - Tue 26th Jul 2022 06:43 am
- बातमी शेयर करा
बामणोली : सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्या कास तलावाची उंची वाढवून त्याचे धरणात रूपांतर करण्यात आले. कासच्या सांडव्यावर जीवघेणा सेल्फी घेण्याचा प्रकार नुकताच निदर्शनास आला.
यावर्षी प्रथमच कास धरणामध्ये वाढीव पाणीसाठा करण्यात आला असून कास गावाच्या बाजूने सांडवा तयार करण्यात आला आहे. या सांडव्याला लोणावळ्याच्या भुशी डॅमचा फील देण्यात आला आहे. या सांडव्यावर पाच टप्प्यात पायर्यांचे काम होणार असून पहिल्या टप्प्यातील पायर्या पूर्ण झाल्या आहेत. येथे वाहणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे. सांडव्याच्या भिंतीबाहेरून रस्त्याकडेला प्लास्टिक कागदाची रिबीन बांधण्यात आलेली आहे. ही रिबीन हाताने बाजूला करून हौशी पर्यटक कपल्स सांडव्याच्या भिंतीवर उभे राहून धोकादायक स्थितीत सेल्फी काढत आहेत. हा सेल्फी जीवघेणा ठरू शकतो.
कारण सांडव्याची भिंत खूप उंच आहे. पाणी वाहणार्या ठिकाणी मोठमोठे जांभे दगड टाकण्यात आलेले आहेत. एखादा पर्यटक भिंतीवरून पाय घसरून आत पडला तर ते धोकादायक ठरु शकते. कास धरण भिंतीवरूनही काही पर्यटक चालत सांडव्याच्या बाजूला येत आहेत. सातारा पालिकेने येथे तत्काळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
kass
Kasspathr
स्थानिक बातम्या
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Tue 26th Jul 2022 06:43 am
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Tue 26th Jul 2022 06:43 am
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Tue 26th Jul 2022 06:43 am
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Tue 26th Jul 2022 06:43 am
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Tue 26th Jul 2022 06:43 am
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 26th Jul 2022 06:43 am
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Tue 26th Jul 2022 06:43 am
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Tue 26th Jul 2022 06:43 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 26th Jul 2022 06:43 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Tue 26th Jul 2022 06:43 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Tue 26th Jul 2022 06:43 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Tue 26th Jul 2022 06:43 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Tue 26th Jul 2022 06:43 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Tue 26th Jul 2022 06:43 am













