जंगलातून विनापरवाना वृक्षतोड वाहतुकीवर कारवाई.

ट्रकसहित ३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

प्रतापगड : पोलादपूरच्या घनदाट जंगलातून विनापरवाना वृक्षतोड करून त्या वृक्षाची विनापरवाना वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH-08-H-2775 महाबळेश्वर हद्दीतून पुण्याला जाताना महाबळेश्वर येथील महाड नाक्यावर पोलीस व वनविभागाच्या संयुक्त पथकाने पकडून ताब्यात घेतला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला असून ट्रकसहित ३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलादपूरवरून महाबळेश्वरमार्गे पुण्याला विनापरवाना लाकडाची वाहतुक करणारा ट्रक जाणार असल्याची खबर मिळाल्यावरून साताऱ्याच्या उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज व सहाय्यक वनसरक्षक महेश झांझुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल गणेश महांगडे व महाबळेश्वर पोलीस निरिक्षक यशवंत नलावडे, पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर महाड नाका येथे नाका बंदी केली. शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता खबर मिळाल्याप्रमाणे ऐन, शिवर, किजळ या जातीचे अनगड, गोलटा, नगवड लाकूड माल भरलेला ट्रक नाक्यावर अडविला. तपासणी केले असता चालकाकडे लाकूड वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता व माल वाहतुक करणाऱ्या ट्रकची अधिकृत कागदपत्रे चालकाकडे नव्हती. त्यामुळे वन व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने ट्रक मालासहित चौकशीसाठी ताब्यात घेतला. शनिवारी वनविभागाने ट्रक चालक रविंद्र कृष्णा म्हस्के (वय ४२ रा. पोलादपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास वनपाल सहदेव भिसे करीत आहेत. यावेळी वनविभागाचे लहू राऊत, अभिनंदन सावंत, पोलीस हवालदार पोळ, ढवळे याचा कारवाई पथकाचा समावेश होता.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त