गुरुपौर्णिमेनिमित्त गोंदवले बु। कडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

दहिवडी : संपूर्ण महाराष्ट्राचा आधारस्थान व श्रद्धास्थान असलेल्या माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त माण तालुक्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधारणता ७० ते ८० हजार भाविक येत असतात. त्यामुळे वाहतुकीचे योग्यरीत्या नियोजन करण्याकरिता गोंदवलेकडील जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सातारा जिल्हा अजयकुमार बन्सल यांनी काढलेल्या फतव्यानुसार गोंदवले बु। ता. माण येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा गुरु पौर्णिमा उत्सव दिनांक १३जुलै २०२२ रोजी सकाळी ७:०० वाजलेपासून ते सायंकाळी ८:०० वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडत असतो परिणामी गोंदवलेकडे जाणाऱ्या दहिवडी म्हसवड मार्गावर रहदारीचे प्रमाण सर्वाधिक असते आणि अपघाताची शक्यता अधिक असते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली.
सातारा ते पंढरपूर जाणाऱ्या रोडवरील पिंगळी बुद्रुक गावचे हद्दीतील खांडसरी चौक ते गोंदवले बुद्रुक गावातील आप्पा महाराज चौकापर्यंतचा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. साताऱ्यावरून पंढरपूर,अकलूजकडे जाण्याकरता पिंगळी बुद्रुक गावच्या हद्दीतील खांडसरी चौक ते दहिवडीमार्गे रानंद,मार्डीवरून म्हसवडमार्गे रोड खुला करण्यात आलेला आहे. तसेच खांडसरी चौक ते दहिवडीमार्गे राहणार मार्डीवरून म्हसवडमार्गे पंढरपूर व अकलूजकडे जाणारा रोड असा पर्यायी मार्ग खुला करून वाहतूक वळवली आहे. तसेच पंढरपूरकडून साताऱ्याकडे जाण्यासाठी म्हसवड ते मायणीमार्गे सातारा अथवा म्हसवड ते शिंगणापूर फलटण मार्गे सातारा असं वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे. चुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल,असही सपोनि तासगावकर यांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

 औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?

औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?

औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?

औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला