तुटका कडा तलावातील जमिनीच्या मोबदल्यासाठी अभयसिंह जगताप यांची भुमिका महत्वाची ठरली..

१२ वर्षानंतर शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा..

वरकुटे-मलवडी/वार्ताहर....
     वरकुटे-मलवडी ता.माण येथील तुटका कडा तलावासाठी जमिनी अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना तब्बल १२ वर्षानंतर अभयसिंह जगताप यांनी घेतलेल्या दमदार भूमिकेमुळे मोबदला मिळणार असल्याने, शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. 
    सन २००९ ते २०११ च्या दरम्यान तुटका कडा तलावाचे काम पूर्ण झाले.सुमारे १०० एकर जमीनीचे क्षेत्र पाण्याखाली गेल्याने,मोबदला मिळण्यासाठी गेली १२ वर्षे येथील शेतक-यांनी जलसंधारण विभागाकडे खेटे घातले.मात्र अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी करीत प्रत्यक्ष कामाकडे कानाडोळा केला.त्यातच वरकुटे-मलवडी परिसरातील संधीसाधू नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना पोकळ आश्वासने देत,उपेक्षितांना अनेक वर्षे खेळवले.मात्र १२ वर्षात संबंधित जमिनीच्या मोबदल्यासाठी कसलाही प्रस्ताव शासनदरबारी पाठवला नसल्याचे वास्तव आहे.यामध्ये नैराश्येनं खचलेल्या शेतकऱ्यांसाठी अभयसिंह जगताप यांनी खंबीर भुमिका घेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे पाठपुरावा केला.त्यानंतर १६ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संबंधित जमिनींचा मोबदला मागणी प्रस्ताव महामंडळाकडे पाठविण्याचे कबूल केले.परंतु ६ महिन्यानंतर अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई न केल्याने,अभयदादांनी शेतकऱ्यांसह १६ जून २०२२ रोजी पत्रकार परिषद घेऊन सदर जमिनींचा मोबदला मागणीचा प्रस्ताव १५ दिवसात शासनास सादर न केल्यास जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना गोमुत्राने अभिषेक घालण्याचा निर्णय घेतल्याने हालचाली गतीमान झाल्या.२२ जून रोजी माण-खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी,अभयसिंह जगताप आणि शेतकऱ्यांसह जलसंधारण अधिकाऱ्यांची बैठक झाली.यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना त्वरित हा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्याने,२४ जून २०२२ रोजी अधिकाऱ्यांनी सदर प्रकल्पातील भूसंपादनासाठी प्रकल्पाच्या १५.०४ कोटी रू.च्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण विभाग पुणे यांचेकडे प्रस्ताव पाठविला.अभयसिंह जगताप यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे अधिकाऱ्यांना जाग आल्याने प्रशासन तातडीने कामाला लागले.यामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि उप विभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांविषयी संवेदनशीलतेचे दर्शन घडवत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली.अनेक वर्षे खितपत पडलेले शेतकऱ्यांच्या हिताचे काम मार्गी लागल्याने शेतकरी आनंदले असून,१२ वर्षांच्या लढ्याला अभूतपूर्व यश आल्याने शेतकऱ्यांनी अभयदादांचे मनःपूर्वक आभार मानले.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला