अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पोलिसांची 75 किलोमीटर ची दौड, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचा सहभाग

On the occasion of Amrit Mahotsavi year, 75 km police run, participation of all police stations in the district

सातारा : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना येणारा 15 ऑगस्ट हा दिन विशेष पद्धतीने साजरा होत आहे या दिवशी प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जानार आहे यात 24 तास सेवा बजावणारे  राज्यातील पोलीसही 12 दिवसात 75 किलोमीटर अंतर धावत आहेत याची सुरुवात  25 जुलै पासून जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यात झाली आहेया स्पर्धेचा शेवट सातारा येथे  14 ऑगस्ट रोजी होणार असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील सहभाग घेतलेले सर्व पोलीस अधिकारी अमल दार या स्पर्धेत धावणार आहेत यातून जे स्पर्धक विजेते होतील त्यांना 15 ऑगस्ट रोजी विशेष पदक देऊन गौरविण्यात येणार आहे या अमृत महोत्सवी दौड मध्ये जिल्ह्यात असलेल्या सर्व पोलीस ठाण्यातील अंमलदार ते पोलीस अधिकारी पर्यंतच्या लोकांना सहभाग घ्यावा लागला आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याचे अधिकारी व काही कर्मचारी दररोज सकाळी हे अंतर पार करत आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार पोलीस ठाण्यात आज कोरेगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी आज या भागातील जोगमट परिसरात स्वतः सहभाग घेत ही दौड पोलीस कर्मचाऱ्यासमवेत पूर्ण केली यावेळी वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, पोलीस उपनिरीक्षक बर्गे,पोलीस अंमलदार नितीन पवार, प्रतीक देशमुख, गणेश इथापे, तुषार ढोपरे, आशा झणझणे, माधुरी दीक्षित, प्रियंका शिंदे, चव्हाण, झुंजार, कदम, पाचंगणे,चव्हाण, कर्पे,गुरव,झारी,पवार व निर्भया पथकातील अंमलदार सहभागी झाले होते. दररोज सकाळी लवकर उठून पळावे लागत असल्याने या सर्वच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमद्ये उत्साह आहे. 25 जुलै पासून या दौड मद्ये सहभागी असलेले एकूण स्टाफच्या 25 टक्के कर्मचाऱ्यांना आता या स्पर्ध च्या शेवटच्या दिवसाचे लक्ष लागले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला