काय शाळा...काय शेतकरी... काय नियोजन...सगळं ओक्केमधी...
Satara News Team आशपाक बागवान.
- Sat 2nd Jul 2022 08:16 am
- बातमी शेयर करा
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषीकन्या मृणाल कुलकर्णी, वैष्णवी बाचल, प्रियदर्शनी कुंभार, गंगुताई गोरडे, श्रेया भंडारे,नेहा भागवत यांनी विशेष प्रयत्न केले.
सातारा न्यूज खटाव : वडी ता.खटाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधे महाराष्ट्र कृषीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवंगत कृषीतज्ञ, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिना निमित्त १ जुलै हा दिवस कृषीदिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, राजमाची येथील कृषीकन्यांकडून जि.प.प्राथ.शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला, रंगभरण याबरोबरच वृक्ष दिंडी,वृक्षारोपण हे कार्यक्रम घेऊन कृषीदिन साजरा करण्यात आला. बक्षीस वितरण करण्यासाठी गावच्या प्रथम नागरीक सरपंच सौ.वैशाली मोहीते यांनी वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. माजी सरपंच अनिल सुर्यवंशी, प्रकाश मोहीते, शाळा समितीचे अध्यक्ष अभिजीत येवले, मुख्याध्यापक श्रीकांत भंडारे, शिक्षकसंघाचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत कदम, सर्व शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रकाश मोहीते यांनी कृषीकन्यांचे स्वागत केले, त्यांनी गावामधे शेतक-यांना केलेल्या सहकार्याची प्रशंसा केली. विद्यार्थी प्रतिनीधी म्हणून कु.सृष्टी कदम हिने शेती आणि शेतक-यांची सद्यावस्था यावर आपले मत व्यक्त केले. प्रास्ताविक कु.मृणाल कुलकर्णी हिने केले तर सुर्यकांत कदम यांनी आभार मानले.
krushi
mhahatmafule
vasantrao
vasntraonaik
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 2nd Jul 2022 08:16 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 2nd Jul 2022 08:16 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 2nd Jul 2022 08:16 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 2nd Jul 2022 08:16 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 2nd Jul 2022 08:16 am
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sat 2nd Jul 2022 08:16 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 2nd Jul 2022 08:16 am
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Sat 2nd Jul 2022 08:16 am
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 2nd Jul 2022 08:16 am
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Sat 2nd Jul 2022 08:16 am
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Sat 2nd Jul 2022 08:16 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Sat 2nd Jul 2022 08:16 am










