पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील ६४ सहायक उपनिरीक्षकांना पोलिस उपनिरीक्षक श्रेणी दर्जा

सातारा : निवृत्तीच्या उंबरठ्यावर तरी दोन स्टार लावण्याची आस बाळगून असलेल्या पोलिस जवानांची प्रतीक्षा संपली आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील ६४ सहायक उपनिरीक्षकांना नुकताच पोलिस उपनिरीक्षक श्रेणी दर्जा मिळाला. विशेष म्हणजे यातील सहा जणांना निवृत्तीच्या दोन दिवस आधीच खांद्यावर दोन स्टार लावण्याचा मान मिळाला.
आश्वासित प्रगती योजनेंतर्गत पोलिस दलातील जवानांना पदोन्नती देणे आवश्यक आहे. मात्र, अन्य काही जिल्ह्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यात पदोन्नती प्रक्रिया पार झाली नाही. त्यामुळे जिल्हा पोलिस दलातील पात्र असलेले जवान पदोन्नतीपासून वंचित राहिले. त्यामुळे प्रामुख्याने निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांना खांद्यावर सन्मानाने स्टार मिरविण्याचे भाग्य लाभणार का? असा ‘सकाळ’ने बातमीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी कारकून मंडळींना प्रोत्साहित करत या बढत्यांचा प्रश्‍न मार्गी लावला आहे.
पोलिस दलात ३० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या, तसेच सहायक फौजदार पदावर किमान तीन वर्षे सेवा झालेल्या व उपनिरीक्षक संवर्गाची वेतनश्रेणी घेत असलेल्या जिल्ह्यातील ६४ सहायक फौजदारांना आता उपनिरीक्षक संबोधण्यात येणार आहे.
विलास होळ, विजय पवार, रज्जाक इनामदार, सुरेश पिसाळ, हणमंत आवळे, कय्यूम मुल्ला, श्रीधर पवार, बकाजी इंगवले, मानसिंग शिंदे, सुगंध चव्हाण, संजय परळकर, किरण लाड, वसंत जाधव, शिवाजी हासबे, मोहन क्षीरसागर, लुमा केदारे, अनिल शिंदे, शशिकांत भोसले, कृष्णा सरडे, नारायण मोहिते, सुनील भोसले, शिवाजी भोईटे, सतीश पवार, महेंद्र मोरे, सुधीर येवले, सुनील ढाणे, संजय वामन पवार, गोपीचंद बाकले, श्रीकांत मोरे, पांडुरंग बाबर, अनिल धनवडे, शहाजीराजे भोसले, हणमंत शिंदे, कृष्णा गुरव,
गणेश म्हेत्रस, आयुब खान, उत्तम बर्गे, विजय जाधव, मंगल पवार, कमल घाडगे, राजश्री भोसले, गणेश भोसले, अरुण उंबरे, आनंदराव निर्मल, रुस्तम शेख, भास्कर जगदाळे, शशिकांत पाटील, संजय मापारी, सुनील माने, गजानन भिसे, विष्णू खुडे, अरविंद माने, राजेंद्र थोरात, सुनील काटकर, कृष्णात निंबाळकर, दत्तात्रय सांगोलकर, राजेंद्र निकम, गुलाब दौलताडे, गणेश पवार, नामदेव साळुंखे (फुके), धनाजी भोसले, विजय धनवडे, रवींद्र डोईफोडे, संजय माने या सहायक फौजदारांचा त्यात समावेश आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त