कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भाषा बोलणाऱ्या राम कदम यास साताऱ्यात फिरू देणार नाही.
- विशाल कांबळे
- Fri 16th Dec 2022 11:27 am
- बातमी शेयर करा
सातारा : घरात घुसून मारू असे दलितांसाठी वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांनी चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनात जी भाषा केली आहे. ती चीतावणीखोर,कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी आहे. त्यामुळे राम कदम यास साताऱ्यामध्ये फिरू देणार नाही. असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला आहे.
सर्व समाजाच्या जीवावरती आमदार झालेल्या लोकप्रतिनिधीने एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल बेताल वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचा प्रकार करत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,म. ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आदीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अगोदरच समाजामध्ये चीड निर्माण झालेली आहे.तेव्हा राम कदम यांनी भीमसैनिकेच्या अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न करू नये.मागील एका प्रकरणात राम कदम हे लपून बसले होते.आता त्यांना पळता भुई कमी होईल याचं भान ठेवावं.
ज्यांना महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवायची आहे. या निंदनीय गोष्टीची सुद्धा आम्ही निषेध करीत आहोत.मुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार करून अशा राजकारण्यांवरती कारवाई होण्याकरता मागणी करणार आहोत. चितावणीखोर वक्तव्य करणाऱ्या रामदास कदम यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. कारण संपूर्ण महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आहे.नक्कीच
आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे कार्यकर्ते राम कदम यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाहीत.एवढं मात्र निश्चित आहे.असाही पुनरुच्चार ओव्हाळ यांनी केला आहे.
स्थानिक बातम्या
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास
- Fri 16th Dec 2022 11:27 am
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्यवरांची उपस्थिती
- Fri 16th Dec 2022 11:27 am
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Fri 16th Dec 2022 11:27 am
उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार
- Fri 16th Dec 2022 11:27 am
कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.
- Fri 16th Dec 2022 11:27 am
'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार
- Fri 16th Dec 2022 11:27 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 16th Dec 2022 11:27 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 16th Dec 2022 11:27 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 16th Dec 2022 11:27 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 16th Dec 2022 11:27 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 16th Dec 2022 11:27 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 16th Dec 2022 11:27 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 16th Dec 2022 11:27 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 16th Dec 2022 11:27 am