कलादिग्दर्शक नितीन देसाईंची गळफास घेवून आत्महत्या
Satara News Team
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
- बातमी शेयर करा
मुंबई: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (वय-58) यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
नितीन देसाई यांची 1987 साली चित्रपट कारकीर्द सुरू झाली. ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, पानिपत, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यासारख्या सिनेमांचं कला दिग्दर्शन त्यांनी केले होते. वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.
कर्जतमध्ये एनडी स्टुडिओ 52 एकरात उभारला
2005 मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे 52 एकरात पसरलेला एनडी स्टुडिओ सुरु केला. जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल आणि कलर्सचा रिअॅलिटी शो बिग बॉस यासारखे चित्रपट होस्ट केले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेल्या राजा शिवछत्रपती या स्टार प्रवाह वाहिनीवरील मराठी मालिकेची निर्मिती केली होती. जी मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती.
मी हादरलो ; महेश कोठारे
मी एकदम हादरलो आहे, माझ्या पाया खालची जमीन गेल्यासारखे वाटत आहे. फार मोठी धक्कादायक बातमी आहे. अशी प्रतिक्रिया अभिनेता महेश कोठारे यांनी दिली आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 2nd Aug 2023 01:13 pm













