अवजड वाहतूकीचा वडूथ वाढे पुलाला धोका
सुनिल साबळे- Tue 30th Jul 2024 01:14 pm
- बातमी शेयर करा
शिवथर : कृष्णा, वेण्णा नदीवर १७५ वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दगडी पुल आहेत. सध्या धुवॉंधार पावसाने कहर केला असून यामुळे या दोन्ही पुलाला संभाव्य धोके लक्षात घेऊन मोठी वर्दळ असणारी अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी थेट जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी केली आहे.
सातारा शहराकडे येणाऱ्या राजमार्ग क्रमांक ९५६ डी वर असलेल्या वडूथ येथील कृष्णा नदीवरील तब्बल १७५ वर्षांपुर्वीचा छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वास्तुशास्त्राचा अदभुत नमुना असणारा दगडी बांधकामातील पुल आणि तसाच वाढे गावालगत वेण्णा नदीवरील पूल आहे.या दोन्ही पुलावर पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने मोठे मोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या बांधकामात अनेक झाडे झुडपे उगवली असून त्याचा पुलाला धोका संभवतो. तर पुलावरील खड्ड्यांमुळे सतत अपघात होत असून अनेक वाहनधारकांना दुखापती झाल्या आहेत.
पुलावरील खड्ड्यांचा पुलाच्या अस्तित्वाला धोका ओळखून यावरून मोठी वर्दळ असणारी अवजड वाहतूक या पुलाला धोकादायक ठरू शकते. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या दोन्ही पुलावरील पाऊस कमी होईपर्यंत अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी वडूथ, वाढेसह परिसरातील ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
पुलाच्या मजबुतीसाठी प्रयत्न व्हावा.
तब्बल १७५ वर्षांहून अधिक काळाचा आजही मजबूत आणि वास्तुशास्त्राचा अचंबित करणारा नमुना असलेले वडूथ वाढे येथील नदीवरील पूल आहेत. त्यावर खड्डे पडलेले, झाडे झुडपे उगवलेली असून ही तो आज सुस्थितीत आहे. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुतीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी अवघड वाहतूक या पुलास धोकादायक ठरू शकते, त्यामुळे वाहतूक अन्य पर्यायी मार्गांनी वळवावी, अशी मागणी भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांनी सातारा न्यूज शी बोलताना केली आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 30th Jul 2024 01:14 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 30th Jul 2024 01:14 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 30th Jul 2024 01:14 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Tue 30th Jul 2024 01:14 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 30th Jul 2024 01:14 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 30th Jul 2024 01:14 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 30th Jul 2024 01:14 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Tue 30th Jul 2024 01:14 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 30th Jul 2024 01:14 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Tue 30th Jul 2024 01:14 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Tue 30th Jul 2024 01:14 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Tue 30th Jul 2024 01:14 pm










