कलेक्टर साहेब ग्रामीण भागातील रस्त्यांचा वाली कोण....?

देशमुखनगर  :  ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेऊन वावरत असल्याचे दिसून येते. वेणेगाव ते सासपडे आणि आता सासपडे ते सोनापूर रस्त्याच्या हद्दीतून एका खाजगी कंपनीच्या केबल साठी मोठाली चर काढून पूरण्यासाठी ठेकेदारांनी मक्तेदारी घेऊन जेसीबी पोकलेन ब्रेकर च्या माध्यमातून रस्त्याची वाट लावली आहे. यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधीगिरीची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे कलेक्टर साहेब येथील ग्रामीण भागातील रस्त्याचा वाली कोण...? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


     गेले अनेक दिवसापासून वेणेगाव पासून निसराळे मार्गे सासपडे येथील रस्त्याच्या हद्दीत एका खाजगी कंपनीने केबल पुरण्याचे कामे ठेकेदाराला दिले आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी नसताना हे काम ठेकेदार बिनधास्तपणे करत केबल पुरण्याचे काम चालूच ठेवलेले आहे.

सध्या सासपडे ते सोनापूर येथील रस्त्याच्या हद्दीतून केबलपुरण्याचे जोरात काम चालू आहे. केबल पुरण्यासाठी मोठ्या ब्रेकरच्या मदतीने रस्ता फोडला जात असून रस्ता उध्वस्त करून रस्त्याचे मोठ्या प्रमाणात  नुकसान केले जात असल्याने येथून वाहतुकीला रस्ता ठेवला जात नाही. त्याचबरोबर रस्त्याकडेचे नालेहि गायप झाले आहेत. ठेकेदाराच्या मनमानीमुळे अनेक जणांना गप्प बसावे लागत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधीगिरीची भूमिका घेतल्यामुळे कलेक्टर साहेब आपण या रस्त्याच्या होत असलेल्या नुकसान इकडे लक्ष घालावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला