साता-यात गुरुवारी सातारकरांच्यावतीने श्री.छ. शिवाजीराजे भोसले यांना आदरांजली
प्रकाश शिंदे - Sun 18th Sep 2022 10:39 am
- बातमी शेयर करा
सातारा, - शांत, संयमी, सुसंस्कृत व आपल्या साधेपणाने ओळखले जाणारे आणि छत्रपती घराण्याचे बारावे वंशज श्री.छ. शिवाजीराजे भोसले यांचे 13 सप्टेंबर रोजी अल्प आजाराने निधन झाले त्यामुळे सातारकरांवर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रात अखेरपर्यंत कार्यरत असणा-या श्री.छ. शिवाजीराजे भोसले यांना सातारकरांच्यावतीने आदरांजली वाहण्यात येणार आहे. गुरुवार दि. 22 सप्टेंबर रोजी येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सायंकाळी 5.30 वाजता आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक कार्यात श्री.छ. शिवाजीराजे भोसले यांचे भरीव योगदान होते. त्यांनी सलग सहा वर्षे शाहुनगरीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली आणि त्यांच्या काळात त्यांनी समाजोपयोगी विविध कामे केली. सातारच्या राजघराण्यातील दोन चुलत भावांमधील वैर ज्यावेळेस विकोपाला गेले होते त्यावेळेस दोघांना एकत्र आणून राजघराण्यातील वैरत्व संपवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. जनतेविषयी अतिशय आपुलकी आणि प्रेम असणारे ते राजे होते. अशा या सर्वसामान्यांच्या लोकप्रिय राजांचे 13 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सातारच्या जनतेचे आणि राजघराण्याचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे. स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगलेल्या श्री.छ. शिवाजीराजेंना सर्व क्षेत्रातील सातारकरांच्यावतीने 22 सप्टेंबर रोजी आदरांजली वाहण्यात येणार आहे त्यासाठी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिरीष चिटणीस, अमोल मोहिते, विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 18th Sep 2022 10:39 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 18th Sep 2022 10:39 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sun 18th Sep 2022 10:39 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sun 18th Sep 2022 10:39 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sun 18th Sep 2022 10:39 am
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sun 18th Sep 2022 10:39 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 18th Sep 2022 10:39 am
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Sun 18th Sep 2022 10:39 am
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 18th Sep 2022 10:39 am
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Sun 18th Sep 2022 10:39 am
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Sun 18th Sep 2022 10:39 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Sun 18th Sep 2022 10:39 am










