कास धरणाच्या बंदिस्त पाईपलाईनला मंजुरी : छ उदयनराजे भोसले
Satara News Team
- Fri 9th Dec 2022 07:28 pm
- बातमी शेयर करा
सातारा : केंद्रशासनाच्या अमृत 2.0 योजनेमधुन तांत्रिक मान्यता घेवून, सादर केलेल्या कास धरण ते पॉवर हाऊस अखेर अतिरिक्त गुरुत्व नलिका टाकण्याच्या कामास प्रशासकीय मंजूरी आजच प्राप्त झाली आहे. एकूण 102 कोटी 56 लाख रुपयांच्या या कामास ही प्रशासकीय मंजूरी मिळाल्याने,आता निविदा प्रक्रीया राबवून, या कामाची सुरुवात करण्यात येईल अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
सातारा नगरपरिषदेच्या मालकीच्या कास धरणाची नुकतीच उंची वाढवण्यात आली आहे. उंची वाढवल्यामुळे पूर्वीच्या 107 द.ल.घ.फु. पाण्याची साठवण क्षमता होती ती पाच पट म्हणजेच 502.00दशलक्ष घनफुटइतकी झाली आहे. सातारकडे येणा-या पाण्याच्या प्रवाहाचा दाब वाढला आहे.म्हणूनच नगरपरिषदेने तातडीने सध्याच्या पाईपलाईनव्यक्तीरिक्त आणखी एक पाईपलाईन कासधरणापासून टाकण्याचा प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजूरी दिली आहे.याकामी मध्यंतरी आम्ही केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाचे मंत्री ना.हरदीपसिंह पुरी यांची समक्षभेट घेवून योजनेला मान्यता देणेबाबत मागणी केली होती ना.पुरी यांनी त्याचवेळी संबंधीत अधिका-यांना सुचना देवून,अमृत 2.0 मधुन मान्यता देत असल्याचे ठोस आश्वासन दिले होते. त्यानुसार केंद्रशासनाच्या शिखर समितीने या योजनेस मान्यता दिली. त्यानुसार कास धरण ते पॉवर हाऊस अशी सुमारे 27 किलोमिटरची नवीन अतिरिक्त पाईपलाईन टाकण्यासह,16 एमएलडी क्षमतेचा फिल्टरेशन प्लॅन्ट तसेच 10 लाख लिटर्स क्षमतेची पॉवर हाऊस येथे नवीन पाण्याची टाकी उभारणेआणि 01 मेगावॅट क्षमतेचा जलविदयुत निर्मितीचा प्रकल्प यामहत्वाच्या आणि सातारकरांना चिरकाल लाभ देणा-या कामांचा समावेश आहे. सुमारे 27 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन करीताडिआय आणि एमएस पाईपलाईन वापरणेत येणार आहे. यामध्ये सुमारे 06 किलोमिटर अंतराची 550 एमएम व्यासासची पाईपलाईन, 6 किलोमिटरची 800 एमएम व्यासाची, 4 किलोमीटरची 750 एमएम व्यासाची आणि 700 एमएम व्यासाची 10 किलोमिटर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.
आज धरणातुन अस्तित्वातील पाईपलाईनमधुन दररोज कोणताही खर्च न येता, सुमारे 9एमएलडी शुध्द-स्वच्छ पाणीसातारकरांना उपलब्ध होत आहे. नवीन पाईपलाईन पूर्ण झाल्यावर एकूण 44 एमएलडी शुध्द-स्वच्छ पाणी पाईपलाईनव्दारे उपलब्ध होईल.केंद्रशासन पुरस्कृत अमृत2.0 या योजनेतुन मंजूर करण्यात आलेल्या नवीन अतिरिक्त पाईपलाईनच्या एकूण
102 कोटी 55 लाख खर्चापैकी सुमारे 34 कोटीरुपयेकेंद्रशासन प्रदान करणार आहे, तर राज्यशासन 53 कोटी देणार आहे.
सातारा नगरपरिषदेचा सुमारे 15 कोटी रुपयांचा लोकवर्गणीचा सहभाग असणार आहे. केंद्रीय शिखर समितीची आणि शासनाची प्रशासकीय मंजूरी मिळाल्याने, आता तातडीने निविदा प्रक्रीया राबविली “जावूनत्यानंतर प्रत्यक्ष नवीनअतिरिक्त पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात होईलच.यानिमित्ताने
सातारकरांच्या पुढील पिढीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारे काम मार्गी लागले आहे याचे विशेष समाधान आहे. केंद्रीय मंत्री ना.हरदीपसिंह पुरी यांचेबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जिल्हयाचे पालक मंत्री ना.शंभुराज देसाई यांचे सहकार्य लाभले असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.
udynaraje
kaas
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 9th Dec 2022 07:28 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 9th Dec 2022 07:28 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 9th Dec 2022 07:28 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 9th Dec 2022 07:28 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 9th Dec 2022 07:28 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Fri 9th Dec 2022 07:28 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Fri 9th Dec 2022 07:28 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Fri 9th Dec 2022 07:28 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Fri 9th Dec 2022 07:28 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Fri 9th Dec 2022 07:28 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 9th Dec 2022 07:28 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 9th Dec 2022 07:28 pm












