दोन बायका फजिती एका; कोर्टानं केली नवऱ्याची वाटणी
दोन्ही पत्नींना 3-3 दिवस; रविवारी नवऱ्याला सुट्टी !- Satara News Team
- Wed 15th Mar 2023 05:04 pm
- बातमी शेयर करा
ग्वाल्हेर : एका व्यक्तीच्या दोन बायका… एका पत्नीसोबत पती तीन दिवस राहणार तर दुसऱ्या पत्नीसोबत तीन दिवस राहणार… रविवारी पतीची सु्ट्टी असेल.. तो मर्जीप्रमाणे दोन्हीपैकी कोणत्याही पत्नीसोबत राहू शकतो… आश्चर्य वाटलं ना.. ही काही स्टोरी नाही.. तर खरे आहे.. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे एका नवऱ्याची अशा पद्धतीने वाटणी करण्यात आलेली नाही. इतकेच नाही तर नवऱ्याचा पगारही वाटण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर कुटुंब न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सध्या याची जोरदार चर्चा सुरु आहे.
2018 मध्ये पहिलं लग्न –
मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमधील हे प्रकरण आहे. येथील एक व्यक्ती हरियाणा येथील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर म्हणून चांगल्या पगारावर काम करतो. 2018 मध्ये त्याचं लग्न झालं. त्यानंतर कोरोनामुळे 2020 मध्ये देशभरात लॉकडाऊन लागले होते. त्यावेळी त्या व्यक्तीने पत्नीला ग्वाल्हेरला पत्नीला माहेरी सोडून कामासाठी हरियाणाला माघारी आला. त्यानंतर ऑफिसमधील सहकारी महिलेसोबत त्याचं सूत जुळलं.
ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यासोबत झालं प्रेम –
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना काळात हरियाणामध्ये तो व्यक्ती काम करत होता. त्यावेळी ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांसोबत त्याचं सूत जुळलं. तो ग्वाल्हेरला येत नव्हता. फक्त खर्च पाठवत होता. महिलेला नवऱ्यावर संशय आला. त्यानंतर माहिती घेतल्यानंतर नवऱ्याने दुसरं लग्न केल्याचं समोर आले. हरियाणात त्या व्यक्तीने ऑफिसमधील सहकारी महिलेसोबत दुसरं लग्न केले होते. त्यानंतर महिलेनं कोर्टात धाव घेतली. नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची माहिती पहिल्या पत्नीला मिळाल्यानंतर तिने मोठा गोंधळ घातला. त्यानंतर तिने थेट ग्वाल्हेर कुटुंब न्यायालयात धाव घेतली. सुनावणीच्या वेळी न्यायालयाने नवरा आणि त्याच्या दोन्ही पत्नींमध्ये मध्यस्थी करून हे प्रकरण निकाली काढलं
कोर्ट काऊंसलिंगमध्ये मिटला वाद –
दोन पत्नीचा वाद कोर्टात गेला.. त्यानंतर काऊंसलरने पती आणि पत्नीची समजूत काढली. यावर दोन्ही बाजूंनी चर्चा झाली अन् नवऱ्याची वाटणी ठरली. नवरा एका पत्नीसोबत तीन दिवस राहिल अन् दुसऱ्या पत्नीसोबत तीन दिवस राहिल, असा निर्णय घेण्यात आला. तर रविवार नवऱ्याला ज्या पत्नीकडे राहायचे तिकडे तो राहिल, असा निर्णय झाला. त्याशिवाय त्याचा पगारही समसमान वाटण्यात आला. या प्रकाराची मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये चर्चा आहे.
स्थानिक बातम्या
सोलापूर जिल्हयातील दिग्गज नेतेमंडळींना, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्जवाटप प्रकरणी मोठा झटका
- Wed 15th Mar 2023 05:04 pm
कराडात 40 हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त
- Wed 15th Mar 2023 05:04 pm
जोशी विहीर येथील धोम पुर्नवसन येथे मध्यरात्री धाडसी चोरी,चोरट्यांनी नेले तब्बल १ लाख ८१ हजाराचे दागिने
- Wed 15th Mar 2023 05:04 pm
साताऱ्यात रविवारी जीवन विद्या मिशनच्या रौप्य महोत्सवाचा कृतज्ञता आनंद सोहळा
- Wed 15th Mar 2023 05:04 pm
घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस पाठलाग करून अटक ५,६०,०००/- रूपये किंमतीचा ऐवज जप्त
- Wed 15th Mar 2023 05:04 pm
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्यांचा पाठपुरावा करणार.....आ.मनोज घोरपडे
- Wed 15th Mar 2023 05:04 pm
संबंधित बातम्या
-
साताऱ्यात रविवारी जीवन विद्या मिशनच्या रौप्य महोत्सवाचा कृतज्ञता आनंद सोहळा
- Wed 15th Mar 2023 05:04 pm
-
उडतारे येथील जवान प्रवीण बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Wed 15th Mar 2023 05:04 pm
-
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्यांचा पाठपुरावा करणार.....आ.मनोज घोरपडे
- Wed 15th Mar 2023 05:04 pm
-
कास-कांदाटी-कोयना खोरे बहरले व्हायटी फुलाने
- Wed 15th Mar 2023 05:04 pm
-
सातारा जिल्हा गटसचिव संघटनेच्या वतीने जिल्हा बँकेस सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराबद्दल सत्कार
- Wed 15th Mar 2023 05:04 pm
-
शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप विजयकुमार भुजबळ यांची निवड..
- Wed 15th Mar 2023 05:04 pm