सहा दिवसात साताऱ्यातील मुख्य रस्त्यावरील टपऱ्या काढा अन्यथा

सातारा  : सातारा  शहरातील मुख्य रस्त्यालगत अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. रस्त्याच्याकडेला बंद अवस्थेत टपऱ्या, हातगाडे अनेक दिवसांपासून असल्याची गोष्ट पालिकेच्या निदर्शनास आली आहे. दरम्यान, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी त्या टपरीमालकांना सहा दिवसात अतिक्रमणास ठरत असलेले हातगाडे तत्काळ हटवून घ्यावे अशी मुदत दिली आहे. त्यानंतर टपरी दिसल्यास दंड आकारुन टपरी जप्त करण्यात येणार आहे. 

तशी नोटीस मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील सर्व हॉकर्स धारकांना बजावली गेली आहे. दरम्यान, सातारा वाहतूक शाखेच्यावतीने शहरात जे जे वाहतुकीला पथारीवाले अडथळा करतात त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तहसील कार्यालयाच्या पाठीमागे पालिकेने मोकळी जागा केली होती. त्या जागेवर काहींनी आपले प्रस्तच तयार केले आहे. तेथे कोंबड्या, बकरी डांबून ठेवण्यासाठी वापर केला जात आहे.

 तर रिकाम्या जागेत काळी पिवळया जीप लावल्या जात आहेत. हॉकर्सवाले त्या जागेत जायला तयार नाहीत. तेथे ग्राहक येणार नाही, पालिका सुविधा देणार नाही हे कारण करत त्या जागेस नकार दर्शवला आहे.

 दरम्यान शहरात रोज सकाळ संध्याकाळ वाहतुकीची कोंडी होत असते साताऱ्यातील साईबाबा चौक असू दे मार्केट यार्ड किंवा गजबजलेले ठिकाण खनआळी, राजवाडा परिसर असू द्या येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते.सातारा शहर वाहतूक शाखेचे एपीआय अभिजित यादव यांच्या पथकाकडून जे जे विक्रेते रस्त्यात बसतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. 

तरीसुद्धा साताऱ्यातील काही भागांमध्ये वाहतुकीचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. राधिका रोड तर यासाठी प्रसिद्धच आहे या ठिकाणी कोणतीच कारवाई केली जात नाही. कारण वरचा भाग शहर पोलीस स्टेशन तर रस्त्याचा खालचा भाग शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दीत त्यामुळे या ठिकाणी कारवाई करताना शहर पोलिसांची गंमत तर शाहूपुरी पोलिसांची जमत होत असते. या गमतीजमतीमध्ये मात्र येणाऱ्या जाणाऱ्यांचे हाल होत असतात. सायंकाळच्या टाईमला नगरपालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर तर गांधारीची पट्टीच बांधलेली असते. या ठिकाणी एखाद्या दिवशी भयंकर प्रकार घडल्याशिवाय प्रशासन जाग होणार नाही.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त