सातारच्या छत्रपती कृषी महोत्सवात लक्षवेधक ठरत आहे दीड कोटींचा ..गजेंद्र रेडा
Satara News Team
- Wed 18th Oct 2023 09:50 pm
- बातमी शेयर करा
सातारा. : येथील जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेल्या पाच दिवशी छत्रपती कृषी वाहन व औद्योगिक महोत्सवामध्ये सध्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे कर्नाटक येथून आलेला दीड कोटी रुपयांचा आणि तब्बल वीस पुरस्कारांनी प्राप्त असलेला सहा वर्षाचा गजेंद्र रेडा.
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथील विलास गणपती नाईक या मालकांचा हा सहा वर्षाचा रेडा पंजाब मधून आणलेल्या म्हशी पासून सहा वर्षांपूर्वी जन्माला आला.एक लाख 40 हजाराच्या किमतीला आणलेल्या म्हशी पासून हा गजेंद्र नावाचा रेडा झाला .आणि नाईक परिवाराचे भाग्यच बदलले. महाराष्ट्र ,कर्नाटक यासारख्या राज्यातील सुमारे वीस हुन अधिक प्रदर्शनात लक्षवेधक ठरलेला हा गजेंद्र नावाचा रेडा महाराष्ट्र ,कर्नाटक हिंदकेसरी पुरस्काराने ही सन्मानित झालेला आहे दररोज 15 लिटर दूध पिणारा चार किलो पेंड खाणारा तसेच तीन किलो गव्हाचा आटा खाणारा हा धष्टपुष्ट गजेंद्र दररोज तीन किलो सफरचंद फळे ही खातो बर का.
ऊस ,वैरण, उसाचे वाड, पाचट यासारख्या खाद्यपदार्थांना शुद्ध शाकाहारात स्वीकारणारा हा गजेंद्र सध्या आयशर ट्रक मधून दीड टनाचा वजनाचा असल्यामुळे या प्रदर्शनासाठी दाखल झाला आहे. नाईक परिवाराकडे सध्या पन्नास म्हशी असून दररोज दीडशे लिटर दूध ते विक्री करतात स्मार्ट एक्सप्रेस सांगली यांच्या सोमनाथ शेटे यांचे कडून विविध प्रदर्शनात या गजेंद्र वेड्याला प्रदर्शनासाठी आणले जाते आणि खऱ्या अर्थाने हे प्रदर्शन लक्षवेधक ठरण्यासाठी हा गजेंद्र सर्वात आकर्षण ठरत आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक अनेक नागरिकांनी बुधवारी सकाळपासूनच या गजेंद्र ला पाहण्यासाठी गर्दी केली होती धष्टपुष्ट असा हा गजेंद्र सर्वांचे आकर्षण ठरत आहे तसेच शेकडो युवकांच्या मोबाईल मध्येही तो आपल्या वेगवेगळ्या पोजणी कॅमेऱ्याला सामोरे जात आहे तर अशा या छत्रपती प्रदर्शनाला भेट देताना गजेंद्रलाही आपण अवश्य भेटा असेच आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 18th Oct 2023 09:50 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 18th Oct 2023 09:50 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 18th Oct 2023 09:50 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 18th Oct 2023 09:50 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 18th Oct 2023 09:50 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 18th Oct 2023 09:50 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 18th Oct 2023 09:50 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Wed 18th Oct 2023 09:50 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 18th Oct 2023 09:50 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Wed 18th Oct 2023 09:50 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Wed 18th Oct 2023 09:50 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Wed 18th Oct 2023 09:50 pm










