नरवण्यामध्ये दीपावलीनिमित्त मेंढरांची भव्य तोरण स्पर्धा.....

आंधळी : नरवणे (ता.माण) येथे दिपावली निमित्त भव्य माडियाळ जातीचे मेंढरांची तोरण स्पर्धा नरवणे ग्रामस्थ व मेंढपाळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. 


या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीया असे तीन क्रमांक व सन्मानचिन्ह तोरणा मारणाऱ्या मेंढपाळ यांना देण्यात आले. मेंढपाळ तोरण मारण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकांस शिवाजी धोंडीबा जाधव दहा हजार , द्वितीय क्रमांक प्रकाश आप्पा करे सात हजार बक्षीस, तृतीय क्रमांक मोहन शिवाजी जाधव पाच हजार रुपये व सर्वांना सन्मानचिन्ह देण्यात आले. 


 या कार्यक्रमासाठी दादासाहेब करे सायबू मदने, गुलाब महानवर, किसन शिंगाडे यांनी पंच म्हणून काम केले तर समालोचन ज्ञानेश्वर काटकर यांनी केले. दीपावलीनिमित्त भरवण्यात आलेले या स्पर्धेमध्ये सर्व नरवणे ग्रामस्थांनी सहभाग घेतला व स्पर्धा उत्कृष्ट चांगल्या प्रकारे पार पडल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त