महाराष्ट्राभिमुख, पालकमंत्री शंभूराज

देशाला जगाची महासत्ता बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या वेगवान घडामोडी घडत असताना महाराष्ट्रातल्या अर्थकारणावर आणि राजकारणावर मोठी जबाबदारी आली आहे, अशा अंत्यत निर्णायक काळात भारतात सर्वाधिक जीएसटी मिळवून देणाऱया महाराष्ट्राच्या उत्पादन शूल्क खात्याचा कारभार साहेब आज तुमच्या खाद्यांवर आलाय. परवापर्यंत तुम्ही फक्त मतदार संघाचे होता, कालपर्यंत तुम्ही सातारा जिल्हय़ाचे होता. मात्र आज तुम्ही ‘महाराष्ट्राभिमुख‘ झाला असताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. हिमालयाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा सह्याद्री धावल्याचा भास होत असल्याने तुम्ही केवळ लोकनेत्यांसह स्वर्गीय यशवंतरावांचाही वारसा धीरोदत्त करत आहात....!

नेता जेव्हा ज्या पायरीपर्यंत पोहोचलेला असतो, आपण त्यावेळी त्या पुढच्या पायरीवर जाऊन आपल्या विचारकक्षा लांबवल्या पाहिजेत. गेल्या मंत्रिमंडळात शंभूराज राज्यमंत्री होते पण सत्ता बदल झाला तेव्हा मी ‘साहेब, आता पालकत्व घ्या‘ अशा पुढच्या पायरीवर जाऊन विचारकक्षा रूंदावल्या. जिल्हा आणि राज्यभरातील त्यांच्या चाहत्यांनी त्यावर भरभरून दाद दिली. त्याचवेळी डोक्याची विहीर आणि मेंदूचा बेडूक केलेल्या काहींनी त्याला अतिशयोक्ती मानलं. गेल्या पंचवीस वर्षांत राजकारणाच्या पुढे जाऊन घटना, घडामोडींकडे विचार करायची सवय झाल्यानं मला कधी कोणाचं भाट व्हावं लागलेलं नाहीय. आजही, शंभूराजेंच्या वाढदिवसाला त्यांच्या कौतुकमाळा ओवत बसणार नाही तर जे आहे, जसं आहे ते आणि तसंच मांडणार आहे. कोणी डोक्यावर घेवो किंवा कोणाच्या बुडाला आग लागो म्हणून नव्हे.


साहेब, आमदार होते, राज्यमंत्री होते, तोवर ठीक होते पण ते आता केवळ कॅबिनेट मंत्री झालेत. तेही उत्पादन शूल्कसारख्या अत्यंत महत्चाच्या आणि जबाबदारीच्या खात्याचे. उत्पादन शूल्क म्हणजे केवळ दारूबंदी खातं नव्हे, तर राज्याच्या तिजोरीचा भार सांभाळणारं खातं आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. राज्याचा विकास असो किंवा योजना असोत त्यांची अंमलबजावणी ही या खात्याच्या खांद्यावर असते. भारतातील राज्या-राज्यांमध्ये सर्वाधिक उत्पादन वाढवणे व जास्तीत जास्त जीएसटी मिळवण्याची जबरदस्त स्पर्धा लागली असताना महाराष्ट्रातील पहिल्या पाच मंत्रिपदाच्या यादीतलं हे खातं  
साहेबांना मिळालं. इतकचं नव्हे तर  

मुख्यमंत्र्याच्या जन्मभूमीचे आणि कर्मभूमीचेही साहेबच पालक आहेत!
सातारा आणि ठाणे या अत्यंत महत्वाच्या जिल्हय़ांचे त्यांना पालकत्व देण्यात आलंय यावरून साहेबांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्व लक्षात येईल. नुकताच झालेल्या सत्ताबदलाबद्दल आत्ता भाष्य करणार नाही, कारण हे काही राजकीय वार्तापत्र नव्हे. जेव्हा आपला कोणी अत्यंत महत्वाच्या पदावर पोहोचतो तेव्हा राजकारणापुढं जाऊन व्यक्त व्हावं.  


सातारा जिल्हय़ाला आत्तापर्यंत भाऊसाहेब महाराज, उंडाळकर, रामराजे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब हे जिल्हय़ातले तर जिल्हय़ाबाहेरचे अजितदादा, हर्षवर्धन पाटील, वळसे-पाटील, जयंत पाटील, शिवतारे असे पालकमंत्री झालेत. मात्र यात कामाबाबत अजितदादांचा क्रमांक पहिला असल्याचे मी छातीठोक सांगतो. कामाचा आवाका, फायलींची माहिती, कामाचा दर्जा काम करण्याची इच्छाशक्ती आणि प्रशासनावर जबरदस्त मांड ठेवण्याचे कसब त्यांच्यात होते. का कोण जाणे साहेबांचे काम त्या तोडीचं वाटतं आहे. खरंतर आत्ताच दाखला देणं योग्य नव्हे. मात्र गेल्या काहीच महिन्यात त्यांनी पालकमंत्री  म्हणून दाखवलेला आवाका आणि जिल्हय़ातील सर्व पक्षाच्या आमदारांशी ठेवलेला समन्वय, सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्हय़ातील महत्वाच्या कामांची असलेली जाण, ती सोडवण्यासाठी - पाठपुराव्यासाठीची धमक तसेच राज्यात तितकंच मोठ्ठं वजन हे सगळं आज त्यांच्या जवळ आहे.


हे सगळं होत असताना एक अनाहूत सल्ला देण्याचा का कोण जाणे मोह टाळला जात नाहीय. साहेब, सत्ता म्हणजे गुळाची ढेप आणि जेव्हा गुळाची ढेप आपल्याकडे असते, तेव्हा का कोण जाणे त्याला लागलेले मुंगळे आपल्यालाच दिसत नाहीत. साहेब, फार कमी दिवसांत ढेपेला असे अनेक मुंगळे लागलेत. ते तुम्हीच शोधून काढा. मुळात पाटणचं दोन्ही बाजूचं राजकारण हे अत्यंत प्रखर निष्ठेचं. त्यामुळे तुमचे लोक फिरणार नाहीत पण सत्तेची फळं त्यांच्या पदरात पडणार नाहीत म्हणून हे मुंगळे वेळीच काढा. बाकी, मीडिया आवश्यक आहेच पण कायमच सोबत हवी, हेही चूक.

बाकी, आमचे, जिल्हय़ाचे साहेब ‘राज्याभिमुख‘ झाले असून साक्षात मुख्यमंत्र्याच्या जिल्हय़ाचेही पालक आहेत. अशावेळी तुमच्याकडून महाराष्ट्राचं नक्की भलं होईल, हा  विश्वास आहे,  
म्हणूनच....!

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त