स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने 29 वर्षानी भेटलेल्या मित्राचा अनोखा संकल्प
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने 29 वर्षानी भेटलेल्या मित्राचा अनोखा संकल्प
बापू वाघ- Fri 24th May 2024 10:58 am
- बातमी शेयर करा
वाई : 29 वर्षानी भेटलेल्या मित्रानी आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांच्या सुखदुःखात आपल्या परिवाराचा भाग म्हणून पाठीशी राहून, समाजातील इतरही सामाजिक कामात अग्रेसर राहण्यासाठी आपले योगदान देत राहायचे असे ठरवून हा आपुलकीचा स्नेहमेळावा या सवंगड्यानी एका अनोख्या पद्धतीने साजरा करून आदर्श निर्माण केला.
नवमहाराष्ट्र विद्यालय शिवनगर रायगाव ता जावळी येथील 1995 च्या इयत्ता 10 वीच्या विध्यार्थी विध्यार्थिनीचा स्नेहमेळावा नुकताच तरडगाव ता फलटण येथे झाला,
यावेळी येथील समाजसेवक विष्णू अडसूळ यांच्या आंब्याच्या बागेत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते,
अनेक वर्षानी भेटलेल्या या मित्रानी आपल्या दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहून कृतज्ञता व्यक्त केली, त्यानंतर उच्च पदावर विविध ठिकाणी काम करनारे व आपल्या राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणींचा सन्मान करून,एकमेकांच्या सुख दुःखाच्या चर्चा करत आपल्यापैकी आर्थिक विवंचणेत असलेल्या आपल्या मित्र मैत्रिणीच्या अडचणीत त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी हे सखे सोबती पुढे आले आहेत
तर वेळे येथील अनाथाच्या यशोधन संस्थेसाठी देखील मदत करण्याचे ठरले,
यावेळी समाजसेवक विष्णू अडसूळ यांनी मार्गदर्शन करताना, जन्माला आलो आहोत तर असाच सकारात्मक दृष्टिकोन हवा त्या अनुषंगाने काम केले तर नक्कीच एक चांगले काम केल्याचे समाधान आपल्याला मिळत असते,
आजच्या काळात खरी गरज माणुसकीची आहे ती कायमच आपण जपली पाहिजे, असे सांगितले,
यावेळी कुसुम सुतार,हेमा शिवणकर,राखी गोरे, अर्चना महाडिक, अनिता सोनावणे,राजश्री फरांदे, वैशाली फरांदे, शैलजा माने, नीलम देशमाने, संग्राम शिंदे, गणेश पवार, दत्ता जगदाळे,मनोज पवार, मोहन धुमाळ,माधुरी सोनावणे, सारिका क्षीरसागर, बाळुताई फरांदे,शोभा पवार, विद्या पवार,राजेश फरांदे,उमेश कुलकर्णी, रविंद्र धुमाळ, खंडेराव नांगरे,अजित चव्हाण, संतोष जाधव, राहुल सोनटक्के,बाळकृष्ण फरांदे, प्रशांत गुजर, राजेंद्र सोनावणे,राजेंद्र बोराटे, अनिल सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
" इतक्या वर्षानी आम्ही भेटलो आहे, त्यामुळे आमच्यापैकी काहीजण स्वर्गवासी झाले आहेत, तर काहीजण अजूनही अडचणीत आहेत त्यांना लागेल ती मदत करून आम्ही आमचा मैत्रीचा धर्म आम्ही पाळणार आहोत, आमच्या या संकल्पासाठी आमचे शिक्षक देखील आमच्या पाठीशी उभे आहेत."
राजेश फरांदे
#gatetogether
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 24th May 2024 10:58 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 24th May 2024 10:58 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 24th May 2024 10:58 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 24th May 2024 10:58 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 24th May 2024 10:58 am
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 24th May 2024 10:58 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 24th May 2024 10:58 am
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Fri 24th May 2024 10:58 am
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 24th May 2024 10:58 am
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Fri 24th May 2024 10:58 am
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Fri 24th May 2024 10:58 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Fri 24th May 2024 10:58 am










