सुवर्ण महोत्सवी ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे तारगाव येथे आयोजन
प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांची कीर्तन सेवाSatara News Team
- Wed 8th May 2024 02:10 pm
- बातमी शेयर करा
कोरेगाव : तारगाव तालुका कोरेगाव येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या स यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहे.या सुवर्ण महोत्सवी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह ची सुरुवात गुरुवार दिनांक 9 मे पासून होणार असून समाप्ती बुधवार दिनांक 15 मे रोजी होणार आहे .या सोहळ्यास झी टीव्ही फेम नामांकित कीर्तनकारांची सेवा होणार आहे .
सोहळ्यासाठी ह भ प कबीर महाराज अत्तार नाशिक ,ह भ प विकास महाराज देवडे बारामती ,ह भ प शिवलीलाताई पाटील पंढरपूर ,ह भ प सागर महाराज बोराटे नातेपुते , ह भ प बाळकृष्ण महाराज वसंतगड कराड ,ह भ प ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज कर्जत ,ह भ प संजय महाराज वेळुकर यांची कीर्तने होणार आहेत .बुधवार 15 मे रोजी दुपारी चार वाजले पासून दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे . सोहळ्यात तारगाव येथील स्टार ग्रुपच्या वतीने आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा चित्ररथ सादर करण्यात येणार आहे .
तसेच या कालावधीत ह भ प आनंदराव येडे ,ह भ प संतोष ढाणे ,ह भ प नंदकुमार पाटील, ह भ प गोवर्धन महाराज कोरडे ,प्रा . यशवंत पाटणे , ह भ प राजेंद्र सुकाळे यांची प्रवचने होणार आहेत . महाराष्ट्र राज्य वारकरी संघटनेचे उपाध्यक्ष मदनराव महाराज कदम , हनुमंत महाराज घोरपडे उपस्थिती राहणार आहे .
पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्यात तारगाव व पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन तारगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 8th May 2024 02:10 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 8th May 2024 02:10 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 8th May 2024 02:10 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 8th May 2024 02:10 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 8th May 2024 02:10 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 8th May 2024 02:10 pm
संबंधित बातम्या
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 8th May 2024 02:10 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 8th May 2024 02:10 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 8th May 2024 02:10 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 8th May 2024 02:10 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 8th May 2024 02:10 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 8th May 2024 02:10 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 8th May 2024 02:10 pm










